🕒 1 min read
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकीकडे ‘क्रांतीज्योती विद्यालय’ सारखे सिनेमे गाजत असताना, दुसरीकडे मात्र पडद्यामागे दोन बड्या सिनेमांच्या प्रदर्शनावरून चांगलंच ‘वॉर’ पेटलं आहे. येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी दोन तगडे सिनेमे आमनेसामने येत आहेत आणि यामुळेच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांचा पारा चढला आहे. त्यांनी थेट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांना दम भरला आहे.
अमेय खोपकर आणि अंकुश चौधरी यांचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा सिनेमा ३० जानेवारीला प्रदर्शित होणार, हे आधीच जाहीर झालं होतं. पण, अचानक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांचा ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ हा सिनेमा १६ फेब्रुवारीऐवजी ३० जानेवारीला रिलीज करणार असल्याची घोषणा केली. कोणताही संवाद न साधता थेट क्लॅश केल्यामुळे खोपकर संतापले आहेत.
Amey Khopkar Angry On Digpal Lanjekar
याबाबत बोलताना खोपकर आक्रमक झाले. ते म्हणाले, “फक्त महाराजांचा (छत्रपती शिवाजी महाराज) चित्रपट आहे म्हणून मी गप्प बसलोय. नाहीतर काही निर्माते खरंच शेफारले आहेत, त्यांची मस्ती उतरवायला हवी.” इतकंच नाही तर, “असाच आगाऊपणा केला तर दिग्पाल लांजेकरला बॅन करा, असं मी महामंडळाला सांगेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
खोपकरांनी जेव्हा लांजेकरांना फोन करून जाब विचारला, तेव्हा लांजेकरांनी दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं. “ओह, तुमची आहे का फिल्म?” असा प्रश्न लांजेकरांनी विचारल्याचं खोपकरांनी सांगितलं. यावर खोपकर भडकले. “माझा सिनेमा आधीच जाहीर झाला असताना, तुम्ही घुसखोरी का करताय? वितरकाचं नाव सांगून हात वर करू नका,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
आता या ‘क्लॅश’ मध्ये कोण माघार घेणार की दोन्ही सिनेमे एकाच दिवशी धडकणार? आणि खोपकरांच्या या ‘मनसे स्टाईल’ इशाऱ्यावर दिग्पाल लांजेकर काय उत्तर देणार? याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा निखळ विनोदी सिनेमा असून तो ३० जानेवारीलाच येणार, यावर खोपकर ठाम आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “घरी आल्यावर काय हाकलून देऊ?” अदानींच्या व्हायरल फोटोवर राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, “मी इतका ‘अडाणी’ नाहीये!”
- निवडणुकीचे नियम बदलले? प्रचार संपला तरीही उमेदवारांना ‘ही’ मुभा; आयोगाचा निर्णय वाचून तुम्हीही चक्रावाल!
- ZP Election: अखेर बिगुल वाजले! १२ जिल्ह्यांत ‘या’ तारखेला मतदान; तुमचं गाव यादीत आहे का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










