Share

भाजप-MIM ची ‘छुपी’ युती? भाजप नेत्याचा मुलगा ओवेसींच्या पक्षाच्या पाठिंब्यावर नगरसेवक!

अकोल्यात पुन्हा भाजप-एमआयएम भाई-भाई? भाजपचे जितेन बरेठिया एमआयएमच्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक बनल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.

Published On: 

BJP-MIM Alliance

🕒 1 min read

BJP-MIM Alliance- राजकारणात ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ हे वाक्य तंतोतंत खरं ठरतंय अकोल्यात. “आम्ही युती तोडली” असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ओरडून सांगितलं, पण अकोटमध्ये (Akot) पुन्हा एकदा ‘BJP-MIM Alliance’ चा दुसरा अंक रंगला आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे सुपुत्र जितेन बरेठिया चक्क AIMIM च्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक बनले आहेत. या प्रकारामुळे “वरती दु्श्मनी आणि खाली दोस्ती” असा हा प्रकार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अकोट नगरपालिकेत भाजप आणि एमआयएमच्या युतीवरून गदारोळ झाला होता. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत युती तोडण्याचे आदेश दिले होते. स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीसही बजावण्यात आली. मात्र, ही कारवाई फक्त कागदावरच राहिली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण, एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी भाजप नेते जितेन बरेठिया यांना उघड समर्थन दिलं आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, “अर्ज भरण्याची वेळ निघून गेल्याचे” तांत्रिक कारण देत त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे रिंगणात उरले ते फक्त भाजपचे जितेन बरेठिया! त्यांना एमआयएमच्या गटनेत्या आफरीन अंजुम यांच्यासह पाचही सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप नेत्याचा मुलगा एमआयएमच्या मदतीने पालिकेत पोहोचला, हे आता स्पष्ट झालंय.

या घडामोडींवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. “भाजप आणि एमआयएम हे आतून एकच आहेत, हे आम्ही आधीपासून सांगत होतो, ते आज सिद्ध झालं,” अशी टीका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केली आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेते या Political Drama वर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)