Abhishek Bachchan | ‘ऐश्वर्यामुळे आराध्या हिची वागणूक…! अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य

Abhishek Bachchan On Aaradhya Bachchan And Aishwarya Rai

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Bachchan | मुंबई । अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात कटुता आल्याच्या चर्चा आहे. काही दिवसापूर्वी ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर अनफाॅलो केले इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी देखील ऐश्वर्या राय हिला अनफाॅलो केले.

त्यानंतर त्यांच्यात वाद होत असल्याच्या चर्चाना उधाण आले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय, यांचा वाद टोकाला गेल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय बच्चन हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे तसेच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.  घटस्फोटाच्या अगोदरच अभिषेक याच्या घरातून ऐश्वर्या राय ही बाहेर पडलीये.

ऐश्वर्या राय हिचे सासू जया बच्चन तसेच ननंद श्वेता बच्चन सोबत अजिबातच जमत नसल्याचे सांगितले जाते. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय या गेल्या कितीतरी दिवसांपासून एकमेकींना बोलत नाहीत.

दरम्यान, मुलगी आराध्याच्या (Aaradhya Bachchan) शाळेतील कार्यक्रमात ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसले. एवढेच नाही तर कार्यक्रमानंतर अभिषेक बच्चन ऐश्वर्याची आई वृंदा राय यांना कारपर्यंत सोडायला गेला होता.

आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अगस्त्य नंदा, शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान आणि विद्या बालन यांनी शुक्रवारी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली.

अभिषेक याला आराध्या हिच्याबद्दल विचारण्यात आलं होत. तेव्हा अभिषेक म्हणाला होता, ‘मी आराध्या हिच्यासाठी प्रचंड सक्त वडील नाही. मी तिचे जास्त लाड देखील करत नाही. मला असं वाटतं मुलांवर प्रेम करायला हवं. रोज त्यांना प्रोत्साहित करायला हवं. भावनीक रित्या त्यांचं समर्थन करायला हवं… आजची मुलं प्रचंड हुशार आहेत…’

पुढे मुलाखतीत अभिषेक याला विचारण्यात आलं की, आराध्या हिच्या चांगल्या संगोपनाचं श्रेय कोणाला देशील? त्यावर अभिषेक याने पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rai ) हिचं कौतुक करत म्हणाला, “माझ्या मुलीची काळजी घेण्याचे श्रेय मी ऐश्वर्याला देऊ इच्छितो. मी जेव्हाही चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जातो तेव्हा ती आमच्या मुलीची पूर्ण काळजी घेते.’

पुढे अभिषेक ( Abhishek Bachchan ) म्हणाला, ‘ऐश्वर्या हिच्यामुळे आराध्या हिची वागणूक उत्तम आहे. ऐश्वर्या आणि मी आराध्या हिला फक्त एक चांगली व्यक्ती कशी घडवता यईल यासाठी प्रयत्न करत असतो.’ असं देखील अभिषेक म्हणाला.

महत्वाच्या बातम्या