Mumbai Indians टीम मध्ये असल्याचं सांगत ‘या’ दिग्गज खेळाडूंची कोटींची फसवणूक

Mrinank Singh Arrested By Delhi Police । Rishabh Pant । Mumbai Indians

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians  । आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमच प्रतिनिधीत्व करतो असा दावा करत  एका महाठगाने अनेकांना कोटींचा गंडा घातलाय. एवढेच काय तर तर भारतीय टीम मधील ऋषभ पंतला 2020-2021 दरम्यान या ठगाने 1.63 कोटी रुपयांना फसवलं आहे.

या महाठगाचे नाव मृणांक सिंह असे आहे त्याला चाणक्यपुरी पोलिसांनी अटक केली आहे.  मृणांक अनेक दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता अखेर त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मृणांक सिंहला कोर्टात हजर करुन पोलिसांनी त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे.

मृणांक सिंह हरियाणासाठी अंडर-19 क्रिकेट खेळल्याचे तसेच स्वतःला कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत असतो. आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून त्याने अनेक लक्जरी हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकांना फसवलं आहे. त्याने जुलै 2022 मध्ये ताज पॅलेस हॉटेलला 5 लाख 53 हजार रुपयांना फसवलं आहे.

स्वत:ला क्रिकेटर सांगणारा मृणांक सिंह 22 जुलै ते 29 जुलै 2022 रोजी ताज पॅलेस हॉटेलमध्ये आला होता. हॉटेलच 5,53,362 रुपये बिल न देताच तो तिथून निघून गेला. त्याला या बद्दल विचारलं, तेव्हा त्याने एडिडास कंपनी बिल भरेल असं सांगितलं होते.

बिल चुकवण्यासाठी ताज पॅलेस हॉटेलकडून अनेकदा मृणांक सिंहशी मोबाइलवर संर्पक साधण्यात आला. ड्रायव्हरकडून कॅश पाठवून देतोय, असं उत्तर दिलं. पण कोणी हॉटेलमध्ये आलं नाही.

ताज पॅलेस हॉटेलने चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडीस आला आहे.

महत्वाच्या बातम्या