प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) मोठे आंदोलन पुकारले आहे. मात्र, वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि नेत्या नेहा बोरा यांच्या वक्तव्यांमुळे अभिजीत दिपके यांना स्वकीयांकडूनच मोठा धक्का बसला आहे. या विधानांवरून सीजेपीची कोंडी झाल्याने दिपके यांना मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.
सीजेपीने या प्रकरणी गंभीर आरोप करत आंदोलन उभारले होते, मात्र त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली. यानंतर अभिजीत दिपके यांनीही मोठे आरोप केले. सीजेपीकडून सध्या 'शांती-शांती' आणि 'गांधी-गांधी' असे म्हणत अहिंसक आंदोलनाची भाषा करून आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांच्याच विश्वासू सहकाऱ्यांनी त्यांना अडचणीत आणले.
प्रशांत भूषण यांनी या आंदोलनाबाबत बोलताना, 'आम्हाला सत्ता परिवर्तन हवे असून, या लढाईने सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही,' असे स्पष्ट केले होते. भूषण यांच्या या विधानामुळे सीजेपीला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. या धक्क्यानंतर अभिजीत दिपके यांनी भूषण यांचे नाव न घेता रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली व आपल्याला केवळ अहिंसक मार्गाने आंदोलन करायचे असल्याचे सांगितले.
आपला उद्देश अजिबात सत्ता परिवर्तन नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांना काढून त्याठिकाणी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला बसवावे, ही आमची स्पष्ट मागणी असून सत्तापरिवर्तन व्हावे असे आम्ही म्हणत नसल्याचे ते म्हणाले. तसेच, सीजेपीच्या कायदेशीर सल्लागार रत्ना सिंह यांनीही रात्री उशिरा स्पष्ट केले की, सत्ता परिवर्तन ही त्यांची मागणी नसून केवळ निवडणूक आयुक्तांना बदलण्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे.
दुसरीकडे, नीट पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनात स्टेजवर दिसलेल्या आणि सध्याच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या सीजेपीच्या प्रमुख नेत्या नेहा बोरा यांच्या एका व्हिडीओने खळबळ उडवली आहे. जेनझींची आंदोलने देशभरात आणि बांगलादेशातही झाली असून, त्यांनीच आम्हाला दिशा दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार, असे बोरा यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या सर्व घडामोडींमुळे सीजेपीला वारंवार आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पदवीधर निवडणुकीत महायुतीत ठिणगी! शिंदे गटाने सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला; संजय शिरसाटांचा इशारा
- प्रदीप पूर्णेकर हत्या: टल्ली-पपलू शस्त्रांबाबत देईनात माहिती; मीनाक्षी शिंदेंचीही होणार पोलीस चौकशी
- ‘ज्यांचे वय केवळ १५ ते १७…’; पंतप्रधान मोदींच्या भाषणामुळे वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रिया व्हायरल
Quick Answers
सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारले आहे.
प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केले होते की, त्यांना सत्ता परिवर्तन हवे असून, या लढाईने सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
आपला उद्देश अजिबात सत्ता परिवर्तन नसून, केवळ अहिंसक मार्गाने आंदोलन करणे आणि ज्ञानेश कुमार यांना काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवणे हीच मागणी असल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.
नेहा बोरा यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, जेनझींची आंदोलने देशभरात आणि बांगलादेशातही झाली असून, त्यांनीच दिशा दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






