प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: ‘एपस्टाईन फाईल्स महाराष्ट्र’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांनी केलेल्या ट्रेडमार्कच्या नोंदणीमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनात आणि सेन्सॉर बोर्डासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे.
महिलांच्या शोषणाविरोधात आवाज उठवणारा हा चित्रपट असल्याचे सांगत दिपाली सय्यद यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महिलांचे शोषण करणाऱ्यांविरोधात आम्ही चित्रपट बनवत आहोत. त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर यांनी आम्हाला पाठिंबा देणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी त्यांच्याकडून या चित्रपटाला अडथळा निर्माण केला जात आहे,” असे सय्यद म्हणाल्या.
साड्या किंवा सामान्य नावांवर ट्रेडमार्क मिळवणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. एवढेच नाही तर, सेन्सॉर बोर्डातही या चित्रपटाविरोधात दबाव आणला जात असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे.
समाजासमोर सत्य मांडणाऱ्या आणि चांगल्या कामांना कोणीही रोखू शकत नाही, असा ठाम विश्वास दिपाली सय्यद यांनी व्यक्त केला. तसेच, या चित्रपटावर कोणतीही टीका करण्यापूर्वी लोकांनी तो एकदा पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








