खासदार बजरंग सोनवणेंच्या भाषणापूर्वी तरुणाने घेतला माईक; गेवराईत पाण्यासाठी विचारला जाब

गेवराई तालुक्यातील लोकलढा बैठकीत खासदार बजरंग सोनवणेंच्या भाषणापूर्वीच एका तरुणाने माईक हातात घेत जायकवाडीच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची मागणी केली.

Published On: 

Youth speaking on mic before MP Bajrang Sonwane speech in Gevrai

बीड, 14 नोव्हेंबर: बीडच्या गेवराई तालुक्यातील ४० गावांसाठी जायकवाडी धरणातून स्वतंत्र कालवा काढण्यात यावा, या मागणीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे. याच लोकलढा आंदोलनाच्या एका बैठकीत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या भाषणापूर्वीच एका तरुणाने माईक हातात घेत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची थेट मागणी केली.

गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी येथील मंदिर परिसरात या लोकलढा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मात्र, त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच गावातील मनीष शेळके या तरुणाने माईक घेतला आणि तो थेट खासदारांशी बोलू लागला. बीडमध्ये रेल्वे आणल्याचे श्रेय अनेक जण घेतात, आता तुम्ही आमच्या पाण्यासाठी लढा उभारा, अशी साद या तरुणाने घातली.

बाप्पांनी आम्हाला खरोखरच पाणी आणून दिले, असे आम्ही लोकांना अभिमानाने सांगू, असे मनीष शेळके म्हणाला. या प्रश्नावर आपण आपल्याला शंभर वेळा फोन केला असून, आता तुम्ही इथे आला आहात तर आमचा प्रश्न सोडवाच, अशी मागणी त्याने केली. खासदारांच्या भाषणाआधीच घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून, हे पाणी आज परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे.

पाण्याच्या या आवर्तनामुळे हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. पावसाअभावी कोरडे पडलेले नदी-नाले आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागाला या पाण्यामुळे मोठा आधार मिळणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही