अंबरनाथ हादरले! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा चाकूहल्ला, पोटावर आणि चेहऱ्यावर सपासप वार

अंबरनाथमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Published On: 

MHD LOGO

अंबरनाथ, 14 नोव्हेंबर: अंबरनाथमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर जीवघेणा चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाखा गायकवाड असे या पीडित तरुणीचे नाव असून, ती कामावरून घरी परतत असताना आरोपी हेमंत गुमाणे याने तिच्यावर हा हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात विशाखाच्या पोटावर, हातावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाले आहेत.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी अंबरनाथमधील हाऊसिंग बोर्ड परिसरातील गुरुद्वारासमोर घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाखाला स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी हेमंत तिथून पसार झाला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच, गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे.

या घटनेमुळे अंबरनाथ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नुकतेच दिवाळीच्या काळात फटाके फोडण्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका पती-पत्नीवर हल्ला करण्यात आला होता.

याशिवाय, पार्सलची ऑर्डर रद्द केल्याच्या रागातून एका डिलिव्हरी बॉयने वयोवृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची घटनाही अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन रोडवरील शारदा अपार्टमेंटमध्ये घडली होती. विशेष म्हणजे, या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला डिलिव्हरी बॉयने दुसऱ्या दिवशी बोलावून आपल्या साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. यात तरुणाच्या डोळ्याला आणि गालाला गंभीर दुखापत झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही