गेवराई, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना विकासकामांच्या मुद्द्यावरून स्थानिक तरुणाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. गेवराई तालुक्यातील नारायणवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना भरत व्यासपीठावर एका तरुणाने त्यांना थेट जाब विचारला.
या तरुणाने संताप व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘बजरंग बप्पा, आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे, पण पाण्यासाठी मला तुम्हाला शंभर फोन करावे लागले. आमच्या गावच्या रस्त्यांवर गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत, मग आमचे प्रश्न आम्ही कुणापुढे मांडायचे?’ असा थेट सवाल या तरुणाने भर कार्यक्रमात विचारला.
खासदारांना जाब विचारताना या तरुणाने स्थानिक आमदारांवरही नाराजी व्यक्त केली. आपले गेवराईचे आमदार हे आपण गेवराईचे आमदार आहोत की बीडचे, हेच विसरून गेले असल्याची टीका त्याने केली. दरम्यान, या तरुणाने उपस्थित केलेले सर्व प्रश्न आणि त्याचे म्हणणे खासदार बजरंग सोनवणे यांनी शांतपणे ऐकून घेतले.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








