अजित पवारांच्या घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा ‘मफलरवाला नेता’ कोण? १६ नोव्हेंबरला फुटणार मोठा बॉम्ब

अजित पवारांच्या अपघातामागे असलेल्यांना वाचवणारा ‘मफलरवाला नेता’ कोण, असा सवाल करणारे पोस्टर यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर झळकले आहे. १६ नोव्हेंबरला याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Published On: 

Mysterious poster outside Yashwantrao Chavan center questioning mufflerwala leader in Ajit Pawar accident

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असल्याच्या संशयाला एका नव्या पोस्टरमुळे पुन्हा एकदा उधाण आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर हे रहस्यमय पोस्टर झळकले असून राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. “अजितदादांच्या अपघात / घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?” असा थेट प्रश्न या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र त्यावर एका मफलरची प्रतिकृती छापण्यात आली आहे. या पोस्टरच्या माध्यमातून १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नेमकं काय घडणार आणि कोणता राजकीय बॉम्ब फुटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघात प्रकरणी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीला वाचवणारा ‘मफलरवाला नेता’ कोण, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी हा नेता अरविंद केजरीवाल किंवा छगन भुजबळ नसून दुसराच कोणीतरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, १० ऑक्टोबर रोजी या नेत्याचे नाव जाहीर करून पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

रोहित पवार यांच्या याच जुन्या वक्तव्याचा संदर्भ घेत आता चव्हाण सेंटरबाहेर झळकलेल्या या पोस्टरमागे त्यांचीच भूमिका असावी, असा तर्क लावला जात आहे. मात्र, हे पोस्टर रोहित पवार यांच्या माध्यमातूनच लावले गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या रहस्यमय पोस्टरमागे नेमकं कोण आहे, याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही