सोन्याच्या ७ हंड्यांसाठी शेतात अघोरी पूजा; शेतमालकासह ९ जणांवर गुन्हा दाखल

जालन्यातील टकले पोखरी गावात शेतात पुरलेले सोन्याचे सात हंडे शोधण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Published On: 

Police action against aghori puja in Jalna field for gold pots.

जालना, 13 नोव्हेंबर: जालना जिल्ह्यातील टकले पोखरी गावात शेतात पुरलेले सोन्याचे सात हंडे शोधण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या परतूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत शेतमालकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले पोखरी येथील शेतकरी शिवलाल धोंडीराम राठोड याला आपल्या शेतात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय होता. हे हंडे बाहेर काढण्यासाठी त्याने अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही लोकांना बोलावून घेतले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी शेतात या अघोरी पूजेची मांडणी करण्यात आली.

याच दरम्यान, रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांना या प्रकाराची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विचारपूस आणि झाडाझडती घेतली. तेव्हा या संपूर्ण भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी लिंबू, नारळ, सुपारी, बदाम, कुंकू आणि इतर पूजेचे साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणी परतूर पोलिसांनी संबंधित नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही