फोन टॅपिंगचे आरोप निराधार अन् बालिश; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात

राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी कडाडून टीका केली असून, हे सर्व आरोप निराधार आणि बालिश असल्याचे म्हटले आहे.

Published On: 

Eknath Shinde criticizing Rahul Gandhi over phone tapping allegations

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या खळबळजनक दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राहुल गांधी हे ‘फोन टॅपिंग’सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करत असल्याचा घणाघात शिंदे यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून आपला फोन टॅप केला जात असून, त्याचे सर्व पुरावे आपल्या फोनमध्ये असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला होता. गांधी यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

या आरोपांचा समाचार घेताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ असा टोला लगावत शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने पछाडले आहे. जोपर्यंत ते पंतप्रधानांचे नाव घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची बातमी होत नाही आणि ते माध्यमांच्या चर्चेतही टिकू शकत नाहीत. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठीच ते असे दावे करत आहेत.

कोणताही ठोस मुद्दा, विकासाचे व्हिजन नसताना केवळ खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारणे, हवेत तीर सोडणे आणि रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचणे, हा राहुल गांधींचा आता ‘फुल-टाइम’ उद्योग झाल्याची बोचरी टीका शिंदे यांनी केली. एकीकडे देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत असताना, विरोधी पक्षनेते मात्र अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःचे हसे करून घेत असल्याचेही ते म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही