प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. भाजपला लवकरच सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जेन-झी आंदोलनापासूनच भाजपच्या सत्तेला उतरती कळा लागली असून, त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजप लवकरच सत्तेतून बाहेर जाणार असल्याने पक्षाचे नेतृत्व आणि त्यांचे समर्थक सध्या अस्वस्थ व बिथरलेले आहेत, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी हा दावा केला आहे.
राज्यातील आगामी निवडणुका आणि विविध राजकीय घडामोडी पाहता राज ठाकरे यांचे हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे त्यांच्या या दाव्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मी स्त्री नाही’, AISA नेत्या नेहा बोरा यांचा मोठा खुलासा; स्वतःची ओळख ‘नॉन-बायनरी’ म्हणून केली स्पष्ट
- सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
- दोन्ही शिवसेना एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चेवर मंत्री उदय सामंत यांचे थेट उत्तर








