रामदास कदम यांच्यामुळेच सुनील तटकरे संसदेत? भरत गोगावले यांचा मोठा दावा

रामदास कदम यांच्यामुळेच सुनील तटकरे संसदेत पोहोचल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला असून, कदम-तटकरे वादावर त्यांनी महाडमध्ये सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Published On: 

Sunil Tatkare reacting to Ramdas Kadam's allegations

महाड, 11 नोव्हेंबर: शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. यावरून गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अपघात की घातपात या चर्चेला उधाण आले असून तटकरे यांनी कदम यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. या वादावर आता रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी महाडमध्ये भाष्य केले आहे.

महाड येथे बोलताना गोगावले यांनी तटकरे यांच्या खासदारकीबाबत मोठा दावा केला. “रामदास कदम हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. निवडणुकीत सुनील तटकरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी कदम यांनीच शिफारस केली होती. तसेच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेत त्यांनी ती पार पाडली,” असे गोगावले म्हणाले.

या दोन्ही नेत्यांमध्ये नंतर नेमके काय बिनसले याची आपल्याला कल्पना नसल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. “वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये जसा चांगला समन्वय (ट्युनिंग) आहे, तसाच तो खालच्या पातळीवरही असायला हवा,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद जुनाच आहे. यापूर्वी पालकमंत्री पदावरून दोन वर्षे मोठा संघर्ष झाला होता. त्यानंतर समेट घडून अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. मात्र, कोकणातील राजकीय वाद थांबलेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही