प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेनिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. यंदा कोणतेही निमंत्रण नसले तरी, अमृता फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासह आपल्या इतर बहिणींना ऐपतीप्रमाणे भाऊबीजेची भेटवस्तू पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे यांच्या या निर्णयाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
यापूर्वी जरांगे पाटील आंदोलनात असताना अमृता फडणवीस यांनी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. मात्र, त्यावेळी मैदानात लढत असल्याने आणि आंदोलन सोडता येत नसल्याचे सांगत त्यांनी हे निमंत्रण नाकारले होते. तेव्हा त्यांनी “भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन जेवायला येईन,” असा शब्द दिला होता.
आता भाऊबीजेसाठी कोणत्याही औपचारिक निमंत्रणाची वाट न पाहता त्यांनी स्वतःहून सलोख्याचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “आता बोलावलेलं नाहीये. पण ठीक आहे, आता बहिणींकडे पाठवून देऊ. अमृता ताईकडे, सुनेत्रा ताईकडे पण आपली भाऊबीज पाठवून देऊ. आमच्या जे ऐपतीप्रमाणं आहे ती भाऊबीज पाठवून देऊ.”
📌 महत्वाच्या बातम्या
- रामदास कदम यांच्या आरोपांवर सुनील तटकरे यांचा सणसणीत टोला; एका ओळीतच लावला निकाल
- ‘सँडपेपरगेट’ प्रकरणी उस्मान ख्वाजाच्या दाव्यांवर मिचेल स्टार्कची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘माझी भूमिका…’
- गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान; शांतता राखण्याचे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








