प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी शिवसेना नेते (UBT) संजय राऊत यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने २५ पैकी १३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. असे असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी दोन सदस्य चोरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. कथित मतदान चोरीच्या प्रक्रियेप्रमाणेच हे सदस्य पळवून निवडणुकीचा निकाल फिरवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सदस्य चोरीच्या या आरोपांनंतर महाराष्ट्रातील लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला होता. दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात नुकताच न्यायालयाचा निर्णय आला असून, त्याचा सन्मान राखून निवडणुकीत सहभागी होणार असल्याचे समविचारी पॅनलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व संचालक लवकरच होणाऱ्या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
एकीकडे समविचारी पॅनलने कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे जाण्याची भूमिका घेतली असतानाच, दुसरीकडे भाजप आणि सत्ताधारी आघाडीने गोकुळचा अध्यक्ष आपलाच होणार असल्याचा दावा केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऐन दिवाळीत राजकीय घडामोडी; मंत्री प्रताप सरनाईक यांची संजय राऊतांची अचानक भेट
- “विराटशी बोलताना आरशात पाहिल्यासारखं वाटलं” : निवृत्तीबाबत केन विल्यमसनचा मोठा खुलासा
- “१०० टक्के खरं”: सँडपेपरगेट प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा उस्मान ख्वाजाच्या दाव्यांना पाठिंबा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








