महिलेच्या घरात घुसून विनयभंग अन् मारहाण; वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलवर १४ कलमांखाली गुन्हा दाखल

महिलेच्या घरात घुसून विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांवर सोलापुरात १४ कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

Published On: 

Sushil Karad booked in molestation and assault case in Solapur

सोलापूर, 1 नोव्हेंबर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) याच्यावर सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग, मारहाण आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यासह तब्बल १४ कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुशील कराड याच्यासह अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या त्याच्या दोन साथीदारांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींनी पीडित महिलेच्या घरात घुसून तिला, तिच्या पतीला आणि मुलीला बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादित करण्यात आला आहे.

मारहाण आणि धमकीसोबतच आरोपींनी पीडित कुटुंबाच्या नावावर असलेला प्लॉट, सोने आणि मालकीची वाहने बळजबरीने स्वतःच्या ताब्यात घेतली. हा सर्व धक्कादायक प्रकार २०२४ या वर्षात घडला. याप्रकरणी पीडितेने थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता सोलापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. सध्या या गंभीर प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही