लाडक्या बहिणींची दिवाळी गोड; सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजने’चा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करून मोठे गिफ्ट दिले आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana electric scooter Fake message goes viral

प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’चा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत असून, ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारने हप्ता जमा केल्याने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती. योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांनी मोठ्या संख्येने महायुतीला मतदान केल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे ही योजना राज्याच्या राजकारणात ‘गेम चेंजर’ ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जातात. सुरुवातीला १५०० आणि त्यानंतर २१०० रुपये देण्याचे सरकारने सांगितले होते, मात्र सध्या १५०० रुपये दिले जात आहेत.

दुसरीकडे, विरोधकांकडून या योजनेवर जोरदार टीका केली जात आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येत असून, समाजकल्याण विभागाच्या अनेक योजनांचा निधी ‘लाडकी बहीण’साठी वळवला जात असल्याचा आरोप होत आहे. मध्यंतरी ही योजना बंद होणार असल्याचीही चर्चा रंगली होती, परंतु सरकारने योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) अपात्र महिलांचे अनेक अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच, ज्या महिलांनी अद्याप आपली केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही