आम्ही उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती; फडणवीस-ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांचे मोठे विधान

ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून, आम्ही उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती असे म्हटले आहे.

Published On: 

Sanjay Kenekar vs Sanjay Shirsat

प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया देत भाजपला खडे बोल सुनावले आहेत. २०१९ नंतरच्या घडामोडींनंतर आम्ही उठाव केला नसता, तर भाजप सत्तेत आली नसती, असे शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्पष्ट केले.

ठाकरे बंधू आणि फडणवीस एकत्र आले म्हणजे लगेच नवी राजकीय समीकरणे उदयास येतील, असे मानणे चुकीचे आहे. नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात काही बोलणे झाले आहे का, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे शिरसाट म्हणाले.

दरम्यान, नवनाथ बन यांच्यावरही शिरसाट यांनी निशाणा साधला. नवनाथ बन यांनी आपली पातळी ओळखून टीका करावी, अन्यथा याला फडणवीस यांची मान्यता आहे का, असा सवाल आम्हीही उपस्थित करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, आगामी तीन महिन्यांत राज्यात मोठ्या घडामोडी घडतील, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बरीच चर्चा सुरू असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले. ते एक ‘कॉमन मॅन’ आहेत. पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात शिंदे यांना टार्गेट केले जात असून, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र त्यात त्यांना यश येणार नाही. तसेच, आमच्यात कोणतीही धुसफूस नसून सर्व काही आलबेल असल्याचा दावा मंत्री शिरसाट यांनी केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही