प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: महाराष्ट्रावर ओढवलेल्या दुष्काळाच्या परिस्थितीची दखल घेत एकनाथ शिंदे गटाने त्यांच्या दसरा मेळाव्यात मोठे बदल केले आहेत. नेस्को सेंटर येथे पार पडणाऱ्या या मेळाव्यावर यंदा दुष्काळाचे सावट असल्याने कार्यक्रमाचे स्वरूप बदलण्यात आले आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दरवर्षी प्रमाणे होणारे सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात केवळ थेट भाषणे होणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासांमध्ये हा संपूर्ण मेळावा संपवला जाणार आहे.
गेल्या वर्षी शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली होती. त्याच धर्तीवर यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने मदत दिली जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ दूध संघ निवडणूक: हसन मुश्रीफांच्या मुलासह शौमिका महाडिक पराभूत, सतेज पाटलांची बाजी
- मोहम्मद कैफकडून भुवनेश्वर कुमारची जसप्रीत बुमराहशी तुलना; म्हणाला, ‘विश्वचषकातील पराभवानंतर त्याला बळीचा बकरा बनवलं’
- प्रज्ञान ओझा बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष; रमेश पोवार यांचीही समितीत एन्ट्री
Quick Answers
एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नसून सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स रद्द करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात केवळ थेट भाषणे होणार असून हा संपूर्ण मेळावा दोन ते अडीच तासांमध्ये संपवला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने मदत दिली जाणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






