प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये उभारण्यात आलेल्या ३५ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जात आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण ५ हजार ४१८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण ५० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने महायुतीची 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' आणि महाविकास आघाडीची 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे.
आज दिवसभर चालणाऱ्या या मतदान प्रक्रियेनंतर उद्या, सोमवारी मतमोजणी केली जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार; वडेट्टीवार, ठाकूर आणि सपकाळांचा घणाघात
- CJP Protest: अभिजीत दिपकेंची सशर्त सुटका, मग आशुतोष रांका आणि सौरव दास कोठडीत का?
- २४ तासांनंतर सुटका, तुरूंगातून बाहेर येताच अभिजीत दिपकेंची शाहरूख खानचा फोटो शेअर करत मोठी प्रतिक्रिया
Quick Answers
गोकुळ दूध संघाच्या मतदानासाठी जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकूण ३५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
या निवडणुकीत एकूण ५ हजार ४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत.
महायुतीची 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' आणि महाविकास आघाडीची 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' यांच्यात मुख्य थेट लढत होत आहे.
मतदानानंतर उद्या, सोमवारी मतमोजणी केली जाणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






