प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरद पवार आणि बाळासाहेब यांच्यात अत्यंत घनिष्ट मैत्री होती, मात्र त्यांच्यात तेवढेच मतभेदही होते, असे ठाकरे म्हणाले. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर बाळासाहेब त्यांना भेटण्यासाठी 'वर्षा' निवासस्थानी गेले होते. त्यावेळी पवार बाहेर गेल्यामुळे बाळासाहेबांनी प्रतिभा काकींना पुष्पगुच्छ दिला आणि "माझा मित्र मुख्यमंत्री झाला याचा मला आनंद आहे, पण तो ज्या पद्धतीने झाला ते मला पटले नाही," असे बाळासाहेब म्हणाल्याची आठवण त्यांनी सांगितली.
मतभेद आणि मतभिन्नता यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी आचार्य अत्रे आणि आपले आजोबा (प्रबोधनकार ठाकरे) यांच्यातील नात्याचा संदर्भ दिला. हे दोघे अत्यंत जवळचे मित्र होते, त्यांच्यातील वाद अगदी टोकाला गेले, तरीही ठाकरे कुटुंबात आचार्य अत्रेंबद्दल कधीही कोणी चुकीचे बोलले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
भाजपसोबतच्या संबंधांवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, आमचे आणि भाजपचे कोणतेही वैमनस्य नव्हते. २०१९ पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होतो. मात्र, राजाला तो चुकत असल्याचे सांगितल्यावर राजा जर आपल्यालाच देशद्रोही ठरवणार असेल, तर काय करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या शिवसेनेचा न्यायालयात सुरू असलेला खटला आणि त्याचे प्रशांत देसाई यांच्याकडून रात्री १२ ते १२.३० नंतर येणारे वार्तांकन आपण ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या नशिबी धोंडेच पडणार आहेत, पण उद्याची लोकशाही याच धोंड्यांवर उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारितेच्या भूमिकेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला पत्रकारितेची गंगोत्री म्हटले. पत्रकारांनी क्रिकेट किंवा फुटबॉलमधील पंचांसारखे (अंपायर) तटस्थ असायला हवे. काळासोबत धावले पाहिजे असे सांगत त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या 'दर्पण'च्या पहिल्या अंकात दिसलेल्या लढाऊ पत्रकारितेचा दाखला दिला. 'दर्पण' म्हणजे आरसा असून, त्यातून उपजीविकेच्या नव्या साधनांची माहिती उपलब्ध करून दिली जात होती, असे ते म्हणाले. तसेच, भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर'मधून शतपत्रे काढली. त्यावेळी कुणीही असला तरी त्यावर प्रहार करण्याची सत्यशोधक वृत्ती कशी पुढे आली, हे त्यांनी सांगितले. प्रशांत देसाई यांनी आपले बरेचसे काम केल्यामुळे आपली भूमिका तटस्थ राहण्यासारखी झाल्याचेही ठाकरे म्हणाले.
व्यंगचित्रकार हा केवळ पत्रकार नसून तो एक भाष्यकारही असतो, असे सांगत त्यांनी सोशल मीडियावरील व्यंगचित्रे पाहिल्याचे नमूद केले. मंगळवारी दसरा असून आम्ही ही परंपरा ६० वर्षांपासून करत आहोत. १० वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमाला आलो होतो, मात्र त्यावेळी काय बोललो हे आता आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. 'तुम्ही मला बघत नसलात तरी मी तुमच्यापैकी अनेकांना बघत असतो,' असेही ठाकरे पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय बच्चू कडू यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; अमरावती जिल्हा बँकेतील दावा फेटाळला
- कार्यक्षेत्राबाहेर कारवाई करणाऱ्या FDA अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार; मंत्री नरहरी झिरवाळांचा इशारा
- AUS vs NZ 1st T20I Dream11 Prediction: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याची ड्रीम ११ टीम, खेळपट्टीचा अहवाल आणि संभाव्य प्लेइंग ११
Quick Answers
शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर बाळासाहेब त्यांना भेटायला 'वर्षा'वर गेले होते, तेव्हा पवार बाहेर असल्यामुळे त्यांनी प्रतिभा पवारांना पुष्पगुच्छ दिला. त्या वेळी, "माझा मित्र मुख्यमंत्री झाला याचा मला आनंद आहे, पण तो ज्या पद्धतीने झाला ते मला पटले नाही," असे बाळासाहेब म्हणाले होते.
मतभेद आणि मतभिन्नतेचा फरक स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी आचार्य अत्रे आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील मैत्रीचा संदर्भ दिला. वाद टोकाला जाऊनही ठाकरे कुटुंबात आचार्य अत्रेंबद्दल कधीही कोणी चुकीचे बोलले नाही, असे त्यांनी नमूद केले.
भाजपसोबत आमचे कोणतेही वैमनस्य नव्हते आणि २०१९ पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच राजा चुकत असल्याचे सांगितल्यावर राजा जर आपल्यालाच देशद्रोही ठरवणार असेल, तर काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पत्रकारितेच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी महाराष्ट्राला पत्रकारितेची गंगोत्री म्हटले आणि पत्रकारांनी क्रिकेट किंवा फुटबॉलमधील पंचांसारखे (अंपायर) तटस्थ राहिले पाहिजे, असे सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







