नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: 'लहरा दो तिरंगा' रॅलीपूर्वी दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलेले कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना शनिवारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. नवी दिल्लीतील मंदिर मार्ग येथील या न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.
या निर्णयानंतर आता दीपके यांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अन्वये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. जामिनातील अटींनुसार, त्यांना आगामी एक वर्षभरासाठी शांतता राखावी लागणार असून बंधपत्रातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
कनॉट प्लेस येथे सीजेपीच्या वतीने 'लहरा दो तिरंगा' या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी दीपके यांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले होते.
या आंदोलनापूर्वी २० पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी दीपके यांच्या घरी जाऊन त्यांना दोन वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या होत्या. संभाव्य चेंगराचेंगरी आणि वाहतुकीत होणारा व्यत्यय या कारणास्तव पहिल्या नोटीसद्वारे त्यांना कनॉट प्लेस परिसरात रॅली, निदर्शने किंवा मिरवणूक काढण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. तर दुसरी नोटीस ही जामीनपत्रातील अटींच्या कथित उल्लंघनाशी संबंधित होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचीच सत्ता? CJP चं आंदोलन सुरू असतानाच सर्व्हेचे धक्कादायक कल समोर
- कगिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे पूर्णपणे तंदुरुस्त; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध
- SA vs AUS 2nd Test: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी; खेळपट्टी, हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11
Quick Answers
विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने अभिजीत दीपके यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. या अटींनुसार, त्यांना पुढील एक वर्षासाठी शांतता राखावी लागेल आणि बंधपत्रातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
अभिजीत दीपके यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
पहिल्या नोटीसद्वारे संभाव्य चेंगराचेंगरी आणि वाहतुकीत होणारा व्यत्यय या कारणास्तव कनॉट प्लेस परिसरात रॅली, निदर्शने किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






