Dharashiv, 17 ऑक्टोबर: केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा पंतप्रधानपद भूषवून जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. याच गोष्टीचा राहुल गांधींच्या मनात राग असून त्यामुळेच ते आंदोलने करत असल्याचा दावा आठवले यांनी केला.
यावेळी आठवले यांनी मिश्किल टिप्पणी करत राहुल गांधींना लक्ष्य केले. "२०२९ ला मी नरेंद्र मोदींसोबत क्रिकेट खेळणार आहे आणि राहुल गांधींची विकेट घेणार आहे," असा टोला त्यांनी लगावला. याशिवाय, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. "जो जायेगा जंतर-मंतर, उसको जाना होगा अंदर," असा कवितेतून इशारा त्यांनी आंदोलकांना दिला.
आंदोलनादरम्यान 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके आणि इतर आंदोलकांवर झालेल्या अटकेच्या कारवाईचे आठवले यांनी समर्थन केले. काँग्रेसच्या काळातही आम्ही अनेक आंदोलने केली आणि तेव्हा आम्हालाही अटक व्हायची, अशी आठवण त्यांनी सांगितली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच अशी कारवाई केली जाते, असे ते म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील मतचोरीच्या आरोपांबाबत बोलताना आठवले यांनी त्यांची पाठराखण केली. मतचोरी झाली असेल तर विरोधकांनी त्याचे पुरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिले. नियमांनुसार काही मतदारांची नावे वगळली गेली असतील, तर त्यावरून थेट आयुक्तांना बडतर्फ करता येणार नाही. केवळ विरोधकांच्या आरोपामुळे संविधान धोक्यात आले, असा निष्कर्ष काढता येत नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांचे विशेष कौतुक केले. आंबेडकरी विचारांचा प्रभाव स्वीकारून तरुणांमध्ये जागृती करण्याचे काम दीपके करत असल्याचे ते म्हणाले. दीपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी स्वतःला जोडून घ्यावे, असे आवाहन करत आठवले यांनी त्यांना 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' (आरपीआय) मध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी सराव सत्रात एडन मार्करम अनुपस्थित
- पुणे शिक्षक निवडणूक: पहिल्याच फेरीत २५ हजार मते घेऊन विजयी होणार; माजी आमदार दत्तात्रय सावंतांचा दावा
- एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज; शिवसेनेत लवकरच फेरबदलाची शक्यता, तरुणांना मिळणार संधी
Quick Answers
रामदास आठवले यांच्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा पंतप्रधानपद भूषवून जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे आणि याच गोष्टीचा राहुल गांधींच्या मनात राग आहे.
अभिजीत दीपके आणि इतर आंदोलकांवर झालेल्या अटकेच्या कारवाईचे समर्थन करत आठवले म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच अशी कारवाई केली जाते.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांवर पाठराखण करत आठवले यांनी विरोधकांना आव्हान दिले की, जर मतचोरी झाली असेल तर त्याचे पुरावे द्यावेत.
आठवले यांनी अभिजीत दीपके यांना 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' (आरपीआय) मध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






