छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एका रात्रीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना दिलेला पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आदल्या दिवशी काढून घेतला होता. मात्र, अवघ्या एका दिवसात हा वाद मिटला असून, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून झालेल्या बंडखोरीमुळे महायुतीत हा संभ्रम निर्माण झाला होता. अमरावतीची जागा शिवसेनेला सुटली असताना तिथे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने एकनाथ शिंदे यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ही बंडखोरी शमल्याने महायुतीतील बेबनाव दूर झाला आहे.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर काल अमरावतीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांची सभा झाली. या चर्चेतून बंडखोर उमेदवाराला कोणीही सहकार्य किंवा त्याचा प्रचार करायचा नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानंतर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. 'सतीश चव्हाण यांचा पाठिंबा काढण्याचा अर्थ महायुती तोडायची असा नव्हता, तर अमरावतीतील बंडखोरी शमली पाहिजे एवढाच होता. आता वरिष्ठांच्या शब्दानंतर सतीश चव्हाण यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,' असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
पाठिंबा काढल्याने महायुती तुटल्याचा संभ्रम निर्माण झाला होता, मात्र समन्वयातून वादळ शमले आहे असे शिरसाट म्हणाले. आता महायुतीच्या पाचही जागा कशा निवडून येतील, याकडे आमचे लक्ष असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे आणि अमरावतीत कार्यकर्त्यांचा आग्रह आणि इच्छुकांची गर्दी यामुळे कार्यकर्त्यांनी जोर लावण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सतीश चव्हाण यांनीही आपली भूमिका मांडली. 'काही गैरसमज झाले होते, मात्र ते आता पूर्णपणे दूर झाले आहेत. आमचे घनिष्ठ मित्र संजय शिरसाट यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आता महायुती म्हणून आम्ही एकत्र या निवडणुकीला सामोरे जाणार असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगले काम करतील. मराठवाड्याच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय आम्हाला मिळेल,' असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघातून मानव सुथार आणि गुरनूर ब्रार यांना का वगळलं?
- बीसीसीआयच्या मुख्य निवड समिती अध्यक्षपदी वसीम जाफर यांच्या नावाची चर्चा; रमेश पोवार यांचाही अर्ज
- वैयक्तिक हितसंबंधातून कार्यक्षेत्राबाहेर रेड; FDA च्या २० हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Quick Answers
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
अमरावती शिक्षक मतदारसंघात जागा शिवसेनेला सुटलेली असताना राष्ट्रवादीकडून बंडखोरी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला होता.
अमरावतीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांच्या सभेनंतर बंडखोर उमेदवाराला कोणीही सहकार्य किंवा त्याचा प्रचार करायचा नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असून, मराठवाड्याच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय आम्हाला मिळेल, असा विश्वास सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






