दिल्ली, 17 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. तत्पूर्वी त्यांना विमानतळाहून ताब्यात घेण्यात आले होते.
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी 'तिरंगा मार्च'चे आयोजन करण्यात आले होते. या मार्चपूर्वीच पोलिसांनी दिपके यांना नोटीस बजावली होती. दिल्लीत पोहोचताच त्यांना आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी काही अटी मान्य करण्याच्या बदल्यात त्यांना जामीन देण्यात आला होता.
जामिनावर असतानाही दिपके यांनी पुन्हा दिल्लीत मोर्चा काढला. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत दिल्ली पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केल्याचे जाहीर केले आहे. त्यांना आता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या दिपके नक्की कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
याच आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांना पोलिसांनी मंडी हाऊस परिसरातून ताब्यात घेतले होते. दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी कॅनॉट प्लेस आणि मंडी हाऊससह विविध भागांत झालेल्या निदर्शनांमध्ये पोलिसांनी आंदोलकांना पांगवत १५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले होते.
एकीकडे दिल्लीत या घडामोडींना वेग आला असतानाच, दुसरीकडे ध्रुव राठी याच्याकडून तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी; पण पालिकेच्या २४ कठोर अटी लागू
- अदाणी इन्स्टिट्यूटच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डी. लिट.’ पदवी
- शिक्षकांना धमकावल्यास थेट SIT चौकशी! बावनकुळेंचा कडक इशारा; दर्यापुरात सदावर्तेंविरोधात जोडेमार आंदोलन
Quick Answers
अभिजीत दिपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते.
जामिनावर असतानाही दिपके यांनी पुन्हा दिल्लीत मोर्चा काढला, त्यामुळे जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली आहे.
नेहा बोरा या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना मंडी हाऊस परिसरातून ताब्यात घेतले होते आणि नंतर मध्यरात्री त्यांची सुटका करण्यात आली.
१६ ऑक्टोबर रोजी कॅनॉट प्लेस आणि मंडी हाऊससह विविध भागांतून पोलिसांनी १५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






