MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून, पेपरफुटीच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 16 ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर आयोगाच्या काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सलग १० दिवस आंदोलन करत भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले.

सतीश वाघोले हे सप्टेंबर २०२६ मध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले होते. ७ सप्टेंबरला खुद्द विवेक भीमनवार यांनीच त्यांना सदस्य म्हणून गोपनीयतेची शपथ दिली होती. आता अवघ्या एका महिन्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगातील गैरप्रकार आणि पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची अधिसूचना काढली आहे. या पाच सदस्यीय चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले असणार आहेत. त्यांच्यासोबत निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक, तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचा या समितीत समावेश आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही