जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत निर्णय संसदेतच होतील; देवेंद्र फडणवीसांनी ठणकावले

जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे, तोपर्यंत देशातील निर्णय संसदेतच होतील. हा भारत आहे, पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 16 ऑक्टोबर: जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान या देशात आहे, तोपर्यंत सर्व निर्णय संसदेतच घेतले जातील. हा भारत आहे; पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंका नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे. देशातील सत्ता किंवा व्यवस्था केवळ निवडणुकांच्या माध्यमातूनच बदलेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईमध्ये ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ (स्मार्ट नागरिक) उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित ‘स्मार्ट नागरिक’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकांमधून विद्यार्थी सकारात्मक ऊर्जा घेतील आणि 'स्मार्ट नागरिक' ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेजारील देशांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे संविधान नसल्याचे नमूद करत फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत आपले संविधान अस्तित्वात आहे, तोपर्यंत निर्णय घेण्याची ताकद संसदेकडेच राहील. गेल्या काही वर्षांत संविधानावर आणि लोकशाहीवर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, आपले संविधान इतके मजबूत आहे की, कोणीही भारताच्या लोकशाहीला धक्का लावू शकले नाही. जे लोक भारतातही पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण करण्याचे मनसुबे बाळगून आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, संविधानाने सर्वांना न्याय मिळवण्याचा अधिकार दिला आहे.

संविधानिक मार्गाने प्रत्येकाला न्याय मिळू शकतो. मात्र, कोणी असंविधानिक मार्ग अवलंबल्यास त्याचे काय करायचे, याची स्पष्ट तरतूदही संविधानात असल्याचे त्यांनी सुनावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व देशांच्या संविधानांचा अभ्यास करून, देशातील मूल्यांचा विचार करून आणि अत्यंत संवेदनशीलतेने या संविधानाची निर्मिती केली आहे. हे संविधान पुढील ३०० वर्षांनंतरही तितकेच संबंधित राहील, कारण त्यातील मूल्ये कालजयी आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गीता, बायबल आणि कुराण यांच्यापेक्षा संविधान अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

आपला देश समाजतत्वे विसरल्यामुळे आणि असमानतेमुळे तब्बल एक हजार वर्षे गुलामगिरीत राहिला. मात्र, संविधानाने पुन्हा समता प्रस्थापित करून दाखवली. संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून ते सर्वांना संधीची समानता मिळवून देते. जाती, धर्म आणि विविध भागांमध्ये विभागलेल्या एवढ्या मोठ्या देशाला एकत्र कसे बांधून ठेवायचे, हे या संविधानाने शिकवले आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

जोपर्यंत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे, तोपर्यंत सर्व निर्णय संसदेतच घेतले जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही