नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: सीजेपीच्या 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या झंडेवाला येथील निवासस्थानी दिल्ली पोलीस पोहोचले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी दिपके यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या कारवाईपूर्वी मध्यरात्री दिपके यांनी एक पत्रकार परिषद आणि व्हिडिओ शेअर करून गंभीर आरोप केले होते. गुप्तचर यंत्रणा (आयबी) आणि दिल्ली पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असून हेरगिरी करत असल्याचा दावा त्यांनी केला. बाहेर पडल्यावर नंबर प्लेट नसलेली वाहने आणि साध्या वेशातील पोलीस आपला पाठलाग करत असल्यामुळे कधीही अटक होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कॅनॉट प्लेस आणि आजूबाजूच्या परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान संपूर्ण दिल्ली ठप्प करत असल्याची टीका सीजेपीने केली आहे.
आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांनी १३ ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जंतरमंतरला आंदोलनाच्या ठिकाणांमधून वगळण्यात आल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. सध्या रांका आणि दास पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत. तर, अजिंक्य शिंदे यांना एका वर्षाचा बाँड लिहून घेतल्यानंतर सोडण्यात आले आहे.
दरम्यान, सीजेपीच्या नेत्यांच्या अटकेविरोधात मुंबईतही 'लहरा दो तिरंगा' रॅली सुरू आहे. आझाद मैदान हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण असल्याने पोलिसांनी या मोर्चाला एक दिवसाची परवानगी दिली आहे. या रॅलीत सीजेपीचे समर्थक हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- अर्शदीप सिंग जखमी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक टी-20 सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारचे संघात अनपेक्षित पुनरागमन
- ‘खेळपट्ट्या आणखी सपाट करायला वाव आहे’; धावांच्या महापुरावरून संजय मांजरेकरांचा टोला
- दिनेश कार्तिकने निवडले टॉप ५ टी-२० फलंदाज, विराट कोहली पहिल्या स्थानी तर अभिषेक शर्माला डावलले
Quick Answers
दिल्ली पोलीस कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या झंडेवाला येथील निवासस्थानी पोहोचले आहेत.
दिपके यांच्या दाव्यानुसार, गुप्तचर यंत्रणा (आयबी) आणि दिल्ली पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून हेरगिरी करत आहेत, तसेच नंबर प्लेट नसलेली वाहने आणि साध्या वेशातील पोलीस त्यांचा पाठलाग करत आहेत.
सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये संध्याकाळी पाच वाजता या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ ऑक्टोबर रोजी आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांनी जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जंतरमंतरला आंदोलनाच्या ठिकाणांमधून वगळण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
मुंबईत आझाद मैदान येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, हे आंदोलनासाठी निश्चित ठिकाण असल्याने पोलिसांनी या मोर्चाला एक दिवसाची परवानगी दिली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






