पदवीधर निवडणुकीत महायुतीत ठिणगी! शिंदे गटाने सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला; संजय शिरसाटांचा इशारा

अमरावतीमधील बंडखोरीमुळे महायुतीत बेबनाव निर्माण झाला असून, संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना दिलेला पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केली.

Published On: 

MHD LOGO

छत्रपती संभाजीनगर, 16 ऑक्टोबर: महायुतीतील घटक पक्षांमध्ये बंडखोरीच्या कारणावरून वाद निर्माण झाला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली जात असल्याने याचे थेट पडसाद मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उमटले आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे की, या भूमिकेला उत्तर म्हणून शिवसेनेने (शिंदे गट) मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सतीश चव्हाण यांना दिलेला पाठिंबा सध्या काढून घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी मित्रपक्षांवर नाराजी व्यक्त केली. अमरावती शिक्षक मतदारसंघ हा शिवसेनेला सुटलेला एकमेव मतदारसंघ आहे. मात्र, तिथे अजित पवार यांचे काही काळ पीए राहिलेल्या एका व्यक्तीने बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदारच या उमेदवाराचा प्रचार करत आहेत आणि नंतर त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचे सांगितले जाते, हे कसे शक्य आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा दुटप्पी भूमिकेमुळेच आम्हाला दुसरी भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी नेहमीच महायुतीत 'मिठाचा खडा' पडू नये याची काळजी घेतल्याचे शिरसाट यांनी निदर्शनास आणून दिले. पुण्यातून मंगेश चुटे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून शिंदे यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका दाखवून दिली. "आपण आपापल्यामध्ये पाडापाड्या सुरू केल्या तर आपला काँग्रेस होईल," असा इशाराही त्यांनी दिला.

या वादावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आज अमरावतीला पाठवले आहे. तेथील परिस्थिती बघून राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला समजावून सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. आज तिथे सकारात्मक चर्चा झाल्यास उदय सामंत आणि संबंधित उमेदवाराची संयुक्त पत्रकार परिषद होईल. मात्र, अमरावतीत शिवसेनेला पाठिंबा दिला नाही, तर मराठवाड्यातही सतीश चव्हाण यांना पाठिंबा मिळणार नाही आणि हे धोरण कायम राहील, असे शिरसाट यांनी जाहीर केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

अमरावती शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली जात असल्याने शिवसेनेने (शिंदे गट) सतीश चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही