पुणे, 16 ऑक्टोबर: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना आपला पाठिंबा जाहीर करून मोठा ट्विस्ट आणला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या निर्णयाची माहिती देताना 'काही ठिकाणी अपवाद आहेत', असे स्पष्ट केले. महायुतीकडून या जागेवर भाजपचे कौस्तुभ गावडे रिंगणात आहेत. मात्र, अमरावतीमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर भाजपने बंडखोरी केल्याने, त्याचे पडसाद पुण्यात उमटले असून शिंदेंच्या शिवसेनेने सानपांच्या पारड्यात वजन टाकले आहे. तत्पूर्वी, शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती.
या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले सचिन सानप हे पुण्यातील प्रसिद्ध नवरोजी वाडिया महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयातून एम.ए. केले असून सध्या त्यांचे पीएचडीचे संशोधन सुरू आहे. याव्यतिरिक्त ते पुण्यातील प्रतिष्ठित 'मॉडर्न एज्युकेशन सोसायटी'चे विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज, शासकीय धोरणे आणि मंत्रालयातील फाईल्सचा प्रवास त्यांना अचूक माहीत आहे.
शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार हा केवळ राजकीय व्यक्ती किंवा संस्थाचालक नसावा, तर तो प्रत्यक्ष वर्गात शिकवणारा शिक्षकच असावा, हा सानप यांचा या निवडणुकीतील मुख्य मुद्दा आहे. केवळ रस्त्यावर आंदोलने करून शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत, तर त्यासाठी मंत्रालयातून फाईल्स कशा मंजूर करून घ्याव्यात, याची समज असणे आवश्यक असल्याचे त्यांनी आक्रमकपणे मांडले. फाईल्स मंजूर करण्याच्या याच आत्मविश्वासातून त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला होता.
स्वतः प्राध्यापक असल्यामुळे सानप यांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या समस्यांची उत्तम जाण आहे. त्यातच ओएसडी म्हणून केलेल्या कामामुळे शासकीय यंत्रणेवरील त्यांची पकड हा त्यांचा मोठा प्लस पॉईंट मानला जात आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांचा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या संपूर्ण विभागातील प्राध्यापक आणि शिक्षण संस्थांशी थेट संपर्क आहे. आता या मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, जयंत आसगावकर आणि सचिन सानप यांच्यात अत्यंत चुरशीची तिरंगी लढत होत आहे. अपक्ष म्हणून मैदानात असलेल्या सानप यांच्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे गणित कसे बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- युझवेंद्र चहलचा धक्कादायक खुलासा: ‘त्या’ मद्यधुंद ऑस्ट्रेलियन खेळाडूने बाल्कनीतून खाली लटकवले होते
- ऑस्ट्रेलियाची कर्णधार सोफी मोलिनक्स न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तंदुरुस्त, फोबी लिचफिल्डबाबत साशंकता
- आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का! निकटवर्तीय आणि राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी सोडली ठाकरे गटाची साथ
Quick Answers
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
अमरावतीमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर भाजपने बंडखोरी केल्यामुळे त्याचे पडसाद पुण्यात उमटले आणि शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला.
सचिन सानप हे पुण्यातील नवरोजी वाडिया महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयातून एम.ए. केले असून त्यांचे पीएचडीचे संशोधन सुरू आहे, तसेच ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, जयंत आसगावकर आणि अपक्ष सचिन सानप यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






