प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या उघड झाल्या आहेत. काही ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात यश आले असले तरी, उर्वरित जागांवर तिन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. यामुळे ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे.
एकूण पाच जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत अमरावतीमधील घडामोडींमुळे पुणे शिक्षक आणि संभाजीनगर मतदारसंघात युतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराने आव्हान उभे केले आहे. यावर कुरघोडी म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे.
तसेच, अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला साथ दिल्यास, बदल्यात संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादीला मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरावतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली असून, ही बंडखोरी शमवण्यासाठी शिवसेनेकडून दबाव वाढवण्यात आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत आज अमरावती दौऱ्यावर आहेत.
दुसरीकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद गाझी यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा धक्का दिला आहे. उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. या निर्णयाविरोधात गाझी यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मतपत्रिकांची छपाई पूर्ण झाली असल्याने आता निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मर्यादा आहेत, असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने गाझी यांची याचिका फेटाळून लावली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- AUS-L vs WI-L 2nd Semi-final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२६; जाणून घ्या ड्रीम ११ टिप्स आणि संभाव्य प्लेइंग ११
- राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य; ‘अमेरिका-पाकिस्तान युद्ध झाल्यास भारत पाकच्या बाजूने राहील’
- सीजेपीच्या ‘तिरंगा यात्रे’पूर्वी दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप; २७ हजार जवान तैनात, कलम १६३ लागू
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







