दिल्ली, 16 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आज दिल्लीतील कनॉट प्लेस येथे तिरंगा मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस मला कोणत्याही क्षणी उचलून नेऊ शकतात किंवा अटक करू शकतात, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या ज्या घरात आहेत, त्याच्या चारही बाजूंनी पोलीस आणि आयबीचे अधिकारी तैनात आहेत. बाहेर पडल्यावर नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी आजूबाजूला फिरताना दिसतात. तसेच, इमारतीखाली आल्यावर पोलीस आणि आयबीचे लोक चकरा मारत असल्याचे आणि वॉचमनकडून सतत अपडेट्स घेत असल्याचेही त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आज रात्री किंवा तिरंगा मोर्चाच्या वेळी आपल्याला ताब्यात घेतले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
कनॉट प्लेसवरील या तिरंगा मोर्चाला न्यायालयाकडून आधीच परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, आपण अशा गोष्टींना अजिबात घाबरत नसून तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात जावे लागल्यास त्यासाठी तत्काळ तयार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. यापूर्वी १० ऑक्टोबर २०२६ रोजी पुकारलेल्या आंदोलनावेळी संपूर्ण दिल्ली बंद करून इंटरनेट, रेल्वे आणि बस सेवा थांबवण्यात आली होती. त्यावेळी बॅरिकेड्स लावून जम्मू-काश्मीरमधूनही फोर्स मागवण्यात आल्याचा संदर्भ त्यांनी दिला.
दरम्यान, तिरंगा फडकवण्यावरून सीजेपीने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना तिरंगा फडकवल्यामुळेच पोलिसांनी तुरुंगात टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'आम्हाला तिरंगा फडकू दिला जात नाहीये. पण आम्ही १०० ठिकाणी तिरंगा फडकवणार आहोत, मग तुम्ही १०० ठिकाणे बंद करा. उद्या जर कॉकरोच जनता पार्टीने जाऊन नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत तिरंगा फडकवला, तर तुम्ही ती रॅली रद्द करणार आहात का?' असा थेट सवाल सीजेपीकडून विचारण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- BRIS-W vs ACT-W: ब्रिस्बेन विरुद्ध एसीटी वुमेन्स टी-२० सामन्यासाठी ड्रीम११ प्रेडिक्शन आणि फँटसी टिप्स
- भारत वि. झिम्बाब्वे महिला १ला टी-२० सामना: ड्रीम ११ टीम, पिच रिपोर्ट आणि संभाव्य प्लेईंग ११
- सरन्यायाधीशांवरील टिप्पणी भोवली; संजय राऊत आणि निखिल वागळेंविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल
Quick Answers
अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप केला असून पोलीस आपल्याला कोणत्याही क्षणी उचलून नेऊ शकतात किंवा अटक करू शकतात, असा दावा केला आहे.
कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील कनॉट प्लेस येथे तिरंगा मोर्चाचे आयोजन केले आहे.
नाही, कनॉट प्लेसवरील या तिरंगा मोर्चाला न्यायालयाकडून आधीच परवानगी नाकारण्यात आली आहे.
दिपके यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी १० ऑक्टोबर २०२६ च्या आंदोलनावेळी संपूर्ण दिल्ली बंद करून इंटरनेट, रेल्वे आणि बस सेवा थांबवण्यात आली होती, तसेच बॅरिकेड्स लावून जम्मू-काश्मीरमधूनही फोर्स मागवण्यात आली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








