प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातून एक मोठी राजकीय घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. काही अपवाद वगळता आपण विधानसभेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. दुष्काळाचे संकट अत्यंत गंभीर असून, आपण स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचे ते म्हणाले. यानंतर राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कालच ५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्वांनी मिळून बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, त्यांच्याकडे केवळ सर्वांवर टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. अशा कठीण प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. तसेच शिवसेनेच्या वतीनेही दुष्काळग्रस्त भागात मदत पोहोचवली जाईल, यासाठी हजारो लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी मदतीचा टेम्पो रवाना करण्यात आला. नाना भाणगिरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांसाठी ही मदत उपलब्ध करून दिली आहे. आपण केलेल्या आवाहनानुसार शिवसैनिक सर्वत्र मदतकार्य करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी शेवटी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- यूपीए काळातच EVM आले, आता विरोधकांचे बिनकामाचे राजकारण; प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
- नाना पाटेकर की कॅप्टन स्मित मच्छर? विद्याविहार जोडपुलाच्या नामकरणावरून राजकारण तापले, महापौरांची भूमिका स्पष्ट
- मविआत बिघाडी: ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई, विनायक राऊतांचा शरद पवार गटाला अल्टिमेटम
Quick Answers
आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर केला असून, कालच ५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाना भाणगिरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचा खर्च टाळून मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी ही मदत उपलब्ध करून दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







