मविआत बिघाडी: ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई, विनायक राऊतांचा शरद पवार गटाला अल्टिमेटम

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवार गटात तणाव वाढला असून, ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा विनायक राऊतांनी दिला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो वापरल्याने शिवसेना ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी, ठाकरेंचे फोटो आणि 'मशाल' चिन्हाचा वापर तात्काळ थांबवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा थेट इशारा शरद पवार गटाला दिला आहे.

राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, छत्रपती संभाजीनगर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि नागपूर मतदारसंघांचा समावेश आहे. यातील पुणे पदवीधर मतदारसंघात मविआचे दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शरद पवार गटाकडून हर्षदा देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली असून, याच मतदारसंघातून ठाकरे गटाकडून सुनील मोदी हे देखील निवडणूक रिंगणात आहेत. एकाच जागेवर मविआचे दोन उमेदवार असल्याने आघाडीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीतही नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे इच्छुक होते. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी ही जागा भाजपकडे गेल्याने भाजपने तिथे आपला उमेदवार उभा केला. त्यामुळे चिवटे यांना अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घ्यावी लागली. या घडामोडींमुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो तसेच 'मशाल' चिन्हाचा प्रचार साहित्यावरील वापर तात्काळ थांबवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा थेट इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही