ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरल्यास कायदेशीर कारवाई; विनायक राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा

पुणे पदवीधर निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरण्यावरून शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो, तसेच 'मशाल' हे निवडणूक चिन्ह वापरल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी याप्रकरणी शरद पवार गटाला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने हा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून सुनील मोदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने हर्षदा देशमुख जाधव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे प्रचार साहित्यावरून सुरू झालेला हा वाद मविआतील मतभेदांवर प्रकाश टाकणारा ठरला आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर २०२६ आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्जांची छाननी होईल आणि ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

या पाचही जागांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे. तर, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

सध्या विधानपरिषदेच्या ज्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत, त्यामध्ये औरंगाबाद पदवीधर (सतीश भानुदास चव्हाण – राष्ट्रवादी शरद पवार गट), पुणे पदवीधर (अरुण गणपती लाड – राष्ट्रवादी शरद पवार गट), नागपूर पदवीधर (अभिजीत गोविंदराव वंजारी – काँग्रेस), अमरावती शिक्षक (किरण रामराव सरनाईक – शिवसेना शिंदे गट) आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचा (जयंत दिनकर आसगावकर – काँग्रेस) समावेश आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो, तसेच 'मशाल' हे निवडणूक चिन्ह वापरल्याने विनायक राऊत यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही