प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: चित्रपट सुपरहिट होण्यासाठी नेहमीच तगडी स्टारकास्ट आणि कोट्यवधींच्या बजेटची गरज नसते, हे 'प्रेमदा ऊराली' या कन्नड चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अवघ्या अडीच कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने प्रदर्शनानंतर केवळ १८ दिवसांत ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या दमदार कामगिरीमुळे चित्रपटाने बजेटच्या तुलनेत तब्बल १९६६ टक्के अधिक नफा कमावला आहे. यापूर्वी कमी बजेटमध्ये तयार झालेल्या 'हनुमान अंश' या हिंदी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर असेच अनपेक्षित यश मिळवले होते.
मनोज कुमार दिग्दर्शित हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाला केवळ ६० शो मिळाले होते आणि कमाई अवघी नऊ लाख रुपये इतकीच होती. मात्र, त्यानंतर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि 'माउथ पब्लिसिटी'मुळे चित्रपटाच्या लोकप्रियतेत तसेच कमाईत लक्षणीय वाढ झाली.
या चित्रपटाच्या यशामागे एका अनोख्या प्रचारपद्धतीचाही मोठा वाटा आहे. निर्मात्यांनी जाहिरातींवर भरमसाठ खर्च करण्याऐवजी, लग्नाच्या आमंत्रणपत्रिकांसारखी पत्रके तयार करून ती लोकांमध्ये वाटली. या वेगळ्या प्रयोगामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या कथानकात कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम आणि भावनिक गुंतागुंत अत्यंत प्रभावीपणे रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटात रंगायन रघू, श्री राम, तपस्विनी पूनाचा आणि रामिका शिवू यांच्या मुख्य भूमिका आहेत. सुरुवातीच्या मर्यादित कमाईनंतर 'हनुमान अंश'प्रमाणेच 'प्रेमदा ऊराली'नेही बॉक्स ऑफिसवर घेतलेली ही मोठी झेप सध्या चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘हम आपके हैं कौन’मधील ‘त्या’ सीनसाठी माधुरी दीक्षितने घेतले होते १५ रीटेक; रिअॅलिटी शोमध्ये सांगितला किस्सा
- ‘सावलीसारखा सोबत असतो’; नाना पाटेकरांनी व्हायरल व्हिडीओत केले होते भाचा प्रसाद आणि मल्हारचे कौतुक
- माणुसकीला काळिमा! डिझेलसाठी पैसे नसल्याने बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवले, हतबल बापाने खांद्यावरून गाठले रुग्णालय
Quick Answers
'प्रेमदा ऊराली' या चित्रपटाचे बजेट अवघे अडीच कोटी रुपये होते आणि प्रदर्शनानंतर केवळ १८ दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
हा चित्रपट मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केला असून तो २५ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
निर्मात्यांनी जाहिरातींवर भरमसाठ खर्च न करता लग्नाच्या आमंत्रणपत्रिकांसारखी पत्रके तयार करून ती लोकांमध्ये वाटली होती.
या चित्रपटात रंगायन रघू, श्री राम, तपस्विनी पूनाचा आणि रामिका शिवू यांच्या मुख्य भूमिका आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








