‘हम आपके हैं कौन’मधील ‘त्या’ सीनसाठी माधुरी दीक्षितने घेतले होते १५ रीटेक; रिअॅलिटी शोमध्ये सांगितला किस्सा

‘हम आपके हैं कौन’मधील सुपरहिट गाण्यात गुलेलच्या सीनसाठी तब्बल १० ते १५ रीटेक घ्यावे लागल्याचा खुलासा खुद्द माधुरी दीक्षितने एका कार्यक्रमात केला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांचा १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, या गाण्यातील एका खास सीनच्या चित्रीकरणासाठी तब्बल १० ते १५ रीटेक घ्यावे लागल्याचा किस्सा खुद्द माधुरी दीक्षितने उलगडला आहे.

‘कोण होणार करोडपती’ या मराठी रिअॅलिटी शोमध्ये माधुरीने हजेरी लावली होती. यावेळी कथ्थक नृत्यांगना असलेल्या स्पर्धक प्राजक्ता तावडे यांनी माधुरीला खास सरप्राईज दिले. प्राजक्ता यांनी 'हम आपके हैं कौन' चित्रपटातील माधुरीच्या प्रसिद्ध लूकची झलक मंचावर सादर केली. यामुळे चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत माधुरीने चित्रीकरणादरम्यानचा हा मजेशीर अनुभव सांगितला.

माधुरीने ‘दीदी तेरा देवर दिवाना’ गाण्यातील फूल आणि गुलेलच्या प्रसंगाबाबत माहिती दिली. पडद्यावर हा प्रसंग अतिशय सहज आणि मजेशीर दिसत असला, तरी प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी अनेक अडचणी आल्या होत्या. काही वेळा निशाणा चुकत होता, तर कधी फूल तुटत होते. अनेकदा गुलेलमधून सुटलेले फूल भलतीकडेच दूर जात होते. यामुळे हा सीन व्यवस्थित टिपण्यासाठी तब्बल १० ते १५ वेळा रीटेक घ्यावा लागला.

सुरुवातीला या सीनबाबत निर्मात्यांनाही चिंता वाटत होती. हा प्रसंग पडद्यावर विचित्र दिसेल की काय, अशी भीती त्यांना सतावत होती. परंतु, योग्य कॅमेरा अँगलचा वापर केल्यास हा सीन सुंदर आणि गोड दिसेल, असा विश्वास माधुरी आणि कोरिओग्राफर्सनी त्यांना दिला. अखेर त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले आणि प्रेक्षकांनी या प्रसंगाला पसंतीची पावती दिली.

सूरज आर. बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम आणि भावनांचे सुरेख चित्रण करण्यात आले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्यासह अनुपम खेर, रीमा लागू, आलोक नाथ, रेणुका शहाणे, मोहनीश बहल आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही