तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी FDA मध्ये १० कोटींचा ‘सुपारी’ घोटाळा; फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार

तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीपूर्वी एफडीएमध्ये १० कोटींच्या जप्त सुपारीची विक्री केल्याचा घोटाळा समोर आला असून मंत्री नरहरी झिरवळ यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

Published On: 

Tukaram Mundhe on Nana Patekar

मुंबई, 14 ऑक्टोबर: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त म्हणून धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवायांचा धडाका लावला आहे. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही विभागाकडून मोहीम राबवली जात आहे. मात्र, मुंढे यांच्या नियुक्तीपूर्वी या विभागात लाखो रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जप्त केलेली सुपारी नष्ट केल्याचे वरिष्ठांना भासवून, पाच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या मालाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाने ११ फेब्रुवारी २०२४ रोजी अवैधरित्या वाहतूक होणारे सुपारीचे ११ ट्रक पकडले होते. या कारवाईत ३ हजार ६०५ पोत्यांमध्ये सुमारे १० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली सुपारी जप्त करण्यात आली होती. अन्न विश्लेषकांच्या तपासणीत ही सुपारी खाण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर न्यायालयाने ५ मार्च २०२५ रोजी हा साठा नष्ट करण्याचे आदेश दिले होते.

सुपारीचा साठा नष्ट करण्याबाबत नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. पी. पाटील यांना तोंडी माहिती दिल्याचे संबंधित पाच अधिकाऱ्यांनी नमूद केले होते. मात्र, पाटील यांनी या दाव्याचे खंडन करत, आपल्याला याबाबत कुणीही माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाटील १८ मार्च ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत रजेवर होते. रजेवरून परतल्यानंतर त्यांनी पाचही अधिकाऱ्यांना तीन वेळा लेखी पत्र देऊन विचारणा केली, परंतु त्यांना एकदाही उत्तर मिळाले नाही. या प्रकरणाची फेब्रुवारी २०२६ पासून चौकशी सुरू झाली, मात्र दबाव आणून ती थांबवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. चौकशीदरम्यान या पाचही अधिकाऱ्यांच्या जबाबात विसंगती आढळल्याने भ्रष्टाचाराचे हे प्रकरण चव्हाट्यावर आले.

दोन वर्षे उलटूनही कारवाई न झाल्याने या अधिकाऱ्यांना कोण वाचवत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयाकडून माहिती घेतली असता, या प्रकरणाची फाईल चार दिवसांपूर्वीच मंत्र्यांकडे आल्याचे सांगण्यात आले. पुढील दोन दिवसांत माहिती घेऊन ही फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे. ‘ज्या अधिकाऱ्याने ही फाईल दोन वर्षे दाबून ठेवली, त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल’, असे मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीपूर्वी एफडीएमध्ये जप्त केलेली सुपारी नष्ट केल्याचे वरिष्ठांना भासवून, पाच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सुमारे १० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या या मालाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही