अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची खोचक टीका

संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला असून त्यांची नजर कमजोर झाल्याने डोळे म्युझियममध्ये ठेवण्याची खोचक टीका केली आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लाखोंचा मोर्चा केवळ आठ हजारांचा दिसत असून, त्यांची नजर कमजोर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या माहितीसाठी नेत्रदानानंतर त्यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. अनेक दिवस भूमिगत असलेले शाह बऱ्याच काळाने प्रकट झाले असल्याचे सांगत, राऊत यांनी त्यांच्या प्रकृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाह यांची तब्येत बरी नसून ते मानसिक दडपण आणि नैराश्याखाली असल्याचा दावा राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सोमवारी झालेल्या आंदोलनाबाबत शाह यांनी केलेल्या दाव्याचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. दीड किलोमीटर परिसरात पसरलेल्या मोर्चामध्ये केवळ आठ हजार लोक होते, असे शाह म्हणतात. मात्र, एवढेच लोक होते तर रस्त्यावर अडीच लाख पोलीस का उतरवले, जंतरमंतरला टाळे का लावले आणि गृहमंत्र्यांच्या घराचा परिसर प्रतिबंधित का केला, असे सवाल राऊत यांनी विचारले. शाह यांनी डोळ्यांचा चष्मा तपासावा आणि देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी तात्काळ वैद्यकीय पथक पाठवून समितीमार्फत आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दिल्लीत लाखो लोक धडकतील असे वाटले नसल्याने शाह यांना आंदोलनाची भीती वाटत असल्याचेही राऊत म्हणाले.

निवडणूक आयोगावरही राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे 'माफिया' असून सीमा खन्ना या निवडणूक आयोगाच्या 'लेडी डॉन' आहेत, असे ते म्हणाले. ईव्हीएम घोटाळा आणि १२ कोटी लोकांची मतदार यादीतून नावे वगळण्यामागे ज्ञानेश कुमार यांचा हात असून त्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासाठीच कायदा करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. २०२९ मध्ये भाजप विजयी होईल, हा अमित शाह यांचा दावा नसून त्यांच्या तोंडून ज्ञानेश कुमार आणि सीमा खन्नाच बोलत असल्याचे ते म्हणाले.

२०२९ पर्यंत अमित शाह गृहमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदीही पंतप्रधान नसतील, हे त्यांना माहीत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, असे राऊत म्हणाले. विरोधक घुसखोरांची नावे वगळण्याला विरोध करत असल्याच्या शाह यांच्या विधानावरही त्यांनी पलटवार केला. माजी निवडणूक आयुक्त कुरैशी, माजी सैनिक आणि स्वतः माझे नाव वगळले गेले, मग आम्ही घुसखोर आहोत का? जे भाजपला मतदान करत नाहीत, ते सर्वजण अमित शाह यांच्या व्याख्येनुसार घुसखोर आहेत, अशी टीका त्यांनी केली.

देशाच्या राजधानीत आणि राज्याराज्यांत लोकशाहीचा गळा घोटण्याविरोधात आंदोलने सुरू असून निवडणूक आयोगाविरोधात हे बंड असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने आणि लोकांना बाजारहाट करण्यासाठी बाहेर पडावे लागत असल्याने कालच्या चर्चेनुसार आंदोलनाचे स्वरूप बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा संघर्ष थांबणार नसून रामलीला मैदानावर 'मॉक संसद' भरवून लोकांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले जाईल. तसेच, आता सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी हा देखील या आंदोलनाचाच एक भाग असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांना एक दिवस जावेच लागेल, हे शाह यांनाही माहीत असल्याचे ते शेवटी म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लाखोंचा मोर्चा केवळ आठ हजारांचा दिसत असून त्यांची नजर कमजोर झाली आहे, त्यामुळे नेत्रदानानंतर लोकांच्या माहितीसाठी त्यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही