प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) वरिष्ठ नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना अटक केली असून, या कारवाईवर प्रतिक्रिया देताना दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत कडक इशारा दिला आहे.
अभिजीत दिपके दिल्लीत नसताना काल रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका, सौरभ दास आणि अजिंक्य शिंदे या तिघांना ताब्यात घेतले होते. जंतरमंतर येथील प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर या नेत्यांना त्यांच्या वकिलांनाही भेटू दिले गेले नाही, असा आरोप दिपके यांनी केला आहे.
आज या नेत्यांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना थेट पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या अटकेच्या घडामोडींनंतर अभिजीत दिपके तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया देताना दिपके म्हणाले, "पुढे येऊन जे करायचे आहे ते करा. जंतरमंतरवर तिरंगा फडकवण्यासाठी तुम्ही पाच दिवस तुरुंगात टाकत आहात. या देशात तिरंगा फडकवणे कधीपासून पाप झाले?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "नरेंद्र मोदी यांनी इतके घाबरू नये. जे करायचे ते अधिकृतपणे करा, हवी तर आपत्कालीन परिस्थिती लागू करा. सरकारने आम्हाला तुरुंगात टाकले तरी आम्ही घाबरणार नाही. सत्तेतील सर्व लोक भित्रे असून ते पोलिसांच्या मागे लपत आहेत," असा घणाघात त्यांनी केला.
नागपूर पोलिसांनी दिलेली सुरक्षा आपल्याला नको असल्याचे सांगत दिपके यांनी ती नाकारली आहे. आपला लढा सुरूच राहील असे स्पष्ट करत ते म्हणाले, "तुरुंगात पाठवल्याने आम्ही घाबरत नाही. आमची केवळ एकच मागणी आहे, ती म्हणजे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा. ते सत्तेत राहण्यासाठी मोदींना मदत करत आहेत. कॉकरोच जनता पार्टी हा स्वतंत्र पक्ष असून आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू. मात्र, याचा अर्थ आम्ही 'इंडिया' आघाडीच्या विरोधात आहोत असा होत नाही. आमचे आणि इंडिया आघाडीचे आंदोलन एकाच मागणीसाठी आहे."
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच CJP ला धक्का; दोन नेत्यांची थेट ५ दिवसांसाठी तुरुंगात रवानगी
- पुणे पदवीधरची जागा भाजपकडे गेल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदेंची भेट
- पुणे पदवीधरची जागा भाजपला गेल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दिल्या ‘युतीधर्म’ पाळण्याच्या सूचना
Quick Answers
जंतरमंतर येथील प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.
त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
अटकेनंतर या नेत्यांना त्यांच्या वकिलांनाही भेटू दिले गेले नाही, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.
ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा ही पक्षाची एकमेव मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







