पुणे, 14 ऑक्टोबर: पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीत भारतीय जनता पक्षाला सोडण्यात आल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची माहिती शिंदेंना दिली आणि जागा न मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मंत्री उदय सामंत यांच्यासह पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पुणे शिक्षक आणि पदवीधर, अमरावती शिक्षक, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि नागपूर मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात बंडखोरी झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये बंडखोरी करणाऱ्या तीन नेत्यांवर भाजपने कठोर कारवाई करत त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने पुण्याच्या शिक्षक मतदारसंघावरही दावा सांगितला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागाही भाजपलाच मिळाली. येथून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाचे मंगेश चिवटे इच्छुक होते. जागा भाजपच्या वाट्याला जाऊनही चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. असे असले तरी, तळागाळातील शिवसैनिकांमधील नाराजी अद्याप दूर झालेली नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधरची जागा भाजपला गेल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दिल्या ‘युतीधर्म’ पाळण्याच्या सूचना
- शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी
- सीजेपीच्या ३ नेत्यांना दिल्लीत अटक; जंतरमंतरवर आंदोलनाचा प्रयत्न, तिहार जेलमध्ये रवानगीची शक्यता
Quick Answers
पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोडण्यात आल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत यांच्यासह पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अमरावतीमध्ये बंडखोरी करणाऱ्या तीन नेत्यांना भाजपने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाचे मंगेश चिवटे इच्छुक होते आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








