इंदूर, 12 ऑक्टोबर: इंदूरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० सामन्यात भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) तुफानी फलंदाजी करत नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात त्याने सर्वात कमी चेंडूंमध्ये टी-२० क्रिकेटमधील आपले २००० धावांचे लक्ष्य पूर्ण करत सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडीत काढला.
इंदूरच्या स्टेडियमवर आपली वैयक्तिक ३३ वी धाव घेताच अभिषेकने हा वर्ल्ड रेकॉर्ड रचला. त्याने अवघ्या १०२४ चेंडूंचा सामना करत २ हजार धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता, ज्याने ११६४ चेंडूंमध्ये हा पल्ला गाठला होता. या यादीत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू एरॉन फिंच (१२८३ चेंडू) आणि ग्लेन मॅक्सवेल (१३०४ चेंडू), भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (१३९० चेंडू) आणि न्यूझीलंडचा टीम सायफर्ट (१३९५ चेंडू) यांचा समावेश आहे.
या सामन्यात अभिषेकने २३० च्या स्ट्राईक रेटने ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची झंझावाती खेळी केली. त्याने आपले अर्धशतक केवळ १८ चेंडूंत पूर्ण केले, जे या मालिकेतील त्याचे पहिले अर्धशतक ठरले. वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने झळकावलेले हे तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी क्विंटन डिकॉकने १५ तर टीम डेव्हिडने १६ चेंडूत वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक ठोकले होते. अभिषेकच्या नावावर आता ६५ टी-२० सामन्यांतील ६४ डावांमध्ये ३२.८४ च्या सरासरीने आणि १९५.९६ च्या स्ट्राईक रेटने एकूण २०३६ धावा आहेत, ज्यात ३ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २० षटकांत २२३ धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक व्यतिरिक्त इशान किशनने १८ चेंडूत ३७ तर तिलक वर्माने १६ चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. भारताने दिलेल्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ २०९ धावाच करता आल्या. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. नमन धीरला २, तर अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
📌 महत्वाच्या बातम्या
- सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली इंडिया आघाडीची भेटीची विनंती; विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार
- MPSC अध्यक्ष भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारने फेटाळली; शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती
- राज्यात दसऱ्यानंतर परतीचा पाऊस; पंजाबराव डख यांनी जाहीर केली जिल्ह्यांची यादी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









