Share

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, १३ उमेदवारांची माघार; २३ ऑक्टोबरला होणार मतदान

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून १३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ४१ उमेदवार अंतिम रिंगणात असून या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे.

Published On: 

Aurangabad graduate constituency election candidates list and voting dates. | graduate election

छत्रपती संभाजीनगर, दि. ९ : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी एका उमेदवाराने माघार घेतली होती. त्यामुळे एकूण १३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी नमुना ७-अ व ७-ब मध्ये ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेनंतर प्रसिद्ध करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात 5-औरंगाबाद पदवीधर निवडणूकी संदर्भात माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सह आयुक्त मंजुषा मिसकर, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त कुशालसिंह परदेशी, उपयुक्त नगरपालिका प्रशासन देविदास टेकाळे तसेच तहसीलदार के.के. भदाणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार सुरू झाली असून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या कालावधीत ६२ उमेदवारांनी एकूण ९२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती.

७ ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ९२ नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त माधवी खाडे-चावरे उपस्थित होत्या. या छाननीमध्ये आठ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून नाकारण्यात आले. छाननीनंतर ५४ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध घोषित करण्यात आले होते.

यानंतर ८ ऑक्टोबर रोजी अंकुश रामराव शिंदे यांनी, तर ९ ऑक्टोबर रोजी ॲड. गुल्लापेल्ली योगेश दत्तु, दीपिका बाप्पा उदरभरे, प्रतीक्षा प्रशांत चव्हाण, प्रशांत रमेश पाटील अवसरमल, प्रियंका केशव तांदळे, बाबासाहेब भुजंगराव उगले, मधुकर किसनराव देशमुख, श्यामकुमार सुरेशराव बोडखे, शेख मोहम्मद अख्तर मोहम्मद सादेक, शेख सलीम शेख इब्राहीम, सुदामराव सदाशिवे आणि संदीप देविदास जाधव यांनी उमेदवारी मागे घेतली. असे एकूण 13 उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या 41 उमेदवारांची नावे –

1) चव्हाण सतिश भानूदासराव,जि. छत्रपती संभाजीनगर, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी 2) घुगे दिलीप हरिभाऊ, कोथळज जि.हिंगोली, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 3) डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, कळंब, जि. धाराशिव, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी 4) कृष्णा त्रिंबकराव पवार, सेलू जि.परभणी, महाजनता परिर्वतन पार्टी 5) ॲड.प्रज्ञावंत काशीराम मोरे, पहेनी हिंगोली, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), 6) श्रीधर साळवे, घाणेगाव जि.औरंगाबाद, भीमसेना 7) शेख अब्दुल मलीक अब्दुल खुद्दूस, पाथरी, जि.परभणी, राष्ट्रीय समाज पक्ष 8) संजीवनी मदनराव टेकाळे, सेलू जि.परभणी, स्वराज्य निर्माण सेना 9) अकील अहमद शेख, दुखी नगर जुना जालना जि.जालना, अपक्ष 10) रविराज उर्फ अण्णासाहेब शेषनाथ साबळे- पाटील, तालुका भूम जि. उस्मानाबाद (धाराशिव), अपक्ष 11) चव्हाण अरुण चिंतामण ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 12) अविनाश बंडू गोरे, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 13) प्रा. डॉ. अश्विन कुमार पूरभाजी क्षीरसागर कोळीकर, हदगाव जि. नांदेड, अपक्ष 14) डॉ. अशोक दत्तात्रय कोल्हे, कडबी मंडी जि.परभणी, अपक्ष 15) अशोक दत्ता हेमके, घनसावंगी, जि. जालना, अपक्ष 16) ॲड. अंबादास जाधव, शाहूनगर, जि. बीड, अपक्ष 17) कबाडी भागवत मदन, सेनगाव जि.हिंगोली, अपक्ष 18) किशोरकुमार प्रकाश शिंदे, दैठणा जि.परभणी, अपक्ष 19) केशव दादाराव तांदळे, राजुरी जि.बीड, अपक्ष 20) अब्दुल खालेद अब्दुल रशीद, दर्गा रोड जि. परभणी, अपक्ष 21) उगले गजानन रामनाथ, घनसावंगी जि.जालना, अपक्ष 22) घोटे सुशिल सुरेशराव, अहमदपूर जि.लातूर, अपक्ष 23) नरसिंह पांडुरंग घोणे, जि. लातूर, अपक्ष 24) नामदेव केरबा वाघमोडे, गोवर्धनवाडी जि. धाराशिव, अपक्ष 25) नारायण त्रिंबक सोन्नी, भोकरदन जि.जालना, अपक्ष 26) रमेश विनायकराव पाटील, दलालवाडी जि.छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 27) बालाजी सरस्वती- रामचंद्र पाटील चाकूरकर, चाकूर जि. लातूर, अपक्ष 28) डॉ.भाऊसाहेब केशवराव झिरपे, माजलगाव जि. बीड, अपक्ष 29) ॲड. भारत आसाराम फुलारे, वाळूज जि. छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 30) गंगाधरे भालचंद्र लक्ष्मण, शिवनगर जि. जालना, अपक्ष 31) मनीषा उर्फ मंदा खरात, वाळूज जि.छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 32) इसा यासीन, कटकट गेट जि. छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 33) ॲड. यशोनिल उत्तमराव मोगले, जि. नांदेड, अपक्ष 34) सर युसुफ खान हनीफ खान, दर्गा रोड, जि. परभणी, अपक्ष 35) राजेंद्र लक्ष्मणराव शिंदे शिंपाळकर, बिलोली जि.नांदेड, अपक्ष 36) डॉ. रोहित शिवराम बोरकर, सेनगाव जि.हिंगोली, अपक्ष 37) ॲड. विठ्ठल आबाराव कडवे, मिल कॉर्नर, जि. छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 38) तळेकर विठ्ठल भुजंगराव, मानवत जि.परभणी, अपक्ष 39) विशाल छाया उद्धव नांदरकर, काबरा नगर, जि. छत्रपती संभाजीनगर, अपक्ष 40) आजम शेख, पोखर्णी जि.परभणी, अपक्ष 41) ॲड. ज्ञानोबा ईश्वर माने, कीर्ती हाऊसिंग सोसायटी, एन 8 सिडको, जि. छत्रपती संभाजीनगर, अपक्ष.

२३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी, चिकलठाणा येथील वुडस्ट्रीम डेकर एलएलपी (Woodstrem Decar LLP) येथे होणार आहे. मतमोजणीसाठी ४४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही