दिल्ली, 10 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) आंदोलन सुरू असताना अभिजीत दीपके यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. एका सामान्य नागरिकाने त्यांना सीजेपीच्या फंडिंगबाबत थेट प्रश्न विचारला असता ते (Abhijeet Dipke) चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. या प्रश्नावर चिडलेल्या दीपके यांनी त्यांच्या उत्तरात पीएम केअर फंडाचा उल्लेख केला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती फंडिंगच्या स्रोताविषयी विचारणा करताना दिसत आहे. यावर उत्तर देताना दीपके म्हणाले, “कालच पीएम केअरमधून १० कोटी आले आहेत. हवं तर तुम्ही RTI टाका.” सुनैना होले यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी हा व्हिडीओ शेअर केला असून, दीपके यांनी दिलेल्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दुसरीकडे, सीजेपीच्या या आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. जंतर मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांकडून ड्रोनद्वारे सतत पाळत ठेवली जात आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सीजेपीच्या १,५०० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईअंतर्गत पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, पक्षाचे सह-संयोजक सौरभ दास आणि नेते आशुतोष रांका यांना विमानतळावरून ताब्यात घेतले. तसेच, प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यालाही त्याच्या गुरुग्राममधील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
या आंदोलनादरम्यान दिल्लीतील साऊथ ॲव्हेन्यूवर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाचे इतर नेतेही आंदोलन करत होते. दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफने ममता बॅनर्जी, डेरेक ओ’ब्रायन, डोला सेन, प्रतिमा मंडल आणि समीरुल इस्लाम यांना ताब्यात घेतले असून त्यांना तुरुंगाच्या व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यासोबतच, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, संजय सिंह, सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- करमाळ्यात दुष्काळसदृश स्थितीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मांडली व्यथा
- ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकसोबतचा फोटो शेअर करत मिलिंद गवळींनी व्यक्त केली मोठी खंत
- २४ वर्षांनंतरही ‘पार्टी एंथम’ आहे शाहरुख खानचे हे कल्ट गाणे, नाना पाटेकर यांच्या चित्रपटाने केली होती निराशा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









