प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खडसे हे अपघाती मंत्री होते आणि त्यांनी स्वतःच्या पक्षाशी वारंवार गद्दारी केली, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली. तसेच, प्रत्येक निवडणुकीत आपण खडसे यांना धोबीपछाड देऊन पराभूत केल्याचा दावाही त्यांनी केला.
एकनाथ खडसे यांना नगरपंचायत आणि विधानसभेतही त्यांची जागा दाखवून दिली असल्याचे पाटील म्हणाले. भाजपने खडसे परिवाराला पदे देऊनही ते कधी भाजपचे झाले नाहीत आणि एकनिष्ठ राहिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. शेतकरी दुष्काळाच्या छायेत आणि अडचणीत असताना एकनाथ खडसे यांनी थाटात आपला वाढदिवस साजरा केला, तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व त्यांचे कुटुंबीय फुगड्या खेळत होते, यावरही पाटील यांनी आक्षेप घेत टीका केली.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या निवासस्थानाची आणि फार्म हाऊसची ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याचा आरोप आहे. २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या फार्म हाऊसवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळल्याचा दावा करण्यात आला होता. या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत खडसेंचे दावे खोडण्याचा प्रयत्न केला. खडसे यांच्या घराजवळून जाणारी विमाने ही प्रत्यक्षात पायलट ट्रेनिंग कंपनीची विमाने असतात, असा दावा पाटील यांनी केला.
ड्रोनबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी अधिकाऱ्यांकडून याची खात्री करायला हवी होती, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. आपल्याला एकनाथ खडसे यांच्या बुद्धीमतेची कीव करावीशी वाटते असे म्हणत, त्यांची बुद्धिमत्ता मुक्ताईनगरसाठी किती कामी आली, असा उपहासात्मक सवाल पाटील यांनी विचारला. तसेच खडसे यांचे नाव केवळ त्यांच्या उपद्रवमूल्यासाठी ओळखले जाते, असा टोलाही त्यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर दाखल करा; रोहित पवारांचे पुणे पोलिसांना थेट आव्हान
- ‘आपण एकत्र यायचं का?’ सुप्रिया सुळेंच्या घरी पार्थ पवारांना विचारल्याचा युगेंद्र पवारांचा गौप्यस्फोट
- केसांमधील कोंड्यापासून मुक्ती हवीय? त्वचाविकारतज्ज्ञांनी दिला योग्य शॅम्पू आणि स्वच्छतेचा सल्ला
Quick Answers
चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ खडसे हे अपघाती मंत्री होते आणि त्यांनी स्वतःच्या पक्षाशी वारंवार गद्दारी केली. तसेच भाजपने पदे देऊनही खडसे परिवार कधी भाजपचा झाला नाही आणि एकनिष्ठ राहिला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळल्याचा आणि निवासस्थानाची रेकी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
चंद्रकांत पाटील यांनी खडसेंचे दावे खोडत असा दावा केला की, खडसे यांच्या घराजवळून जाणारी विमाने ही प्रत्यक्षात पायलट ट्रेनिंग कंपनीची विमाने असतात. तसेच माहिती माध्यमांना देण्यापूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांकडून खात्री करायला हवी होती, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









