तुकाराम मुंढे आणि शाळकरी मुलाचा संवाद: ‘शाळेतला वडापाव पुन्हा सुरू करा’, मुलाच्या प्रश्नावर मुंढेंचं भन्नाट उत्तर

‘शाळेतला वडापाव पुन्हा सुरू करा’, असा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्याला तुकाराम मुंढेंनी जंक फूडचे धोके समजावून सांगत आरोग्याचा खास कानमंत्र दिला आहे.

Published On: 

Tukaram Mundhe giving healthy food advice to a school boy over vadapav ban

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: ‘शाळेतला वडापाव बंद झालाय, माझ्या मित्रांना तो पुन्हा सुरू हवाय, तुम्ही काय सांगाल?’ असा थेट प्रश्न एका शाळकरी मुलाने विचारला, तोही थेट राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना. एरवी आपल्या कडक कारवाईमुळे भल्याभल्यांना घाम फोडणारे मुंढे या निरागस प्रश्नावर हसले आणि त्यांनी अतिशय सोप्या शब्दांत त्या मुलाला आरोग्याचा कानमंत्र दिला.

गेल्या काही महिन्यांपासून मुंढेंनी राज्यात धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून, शाळांच्या कँटीनमध्ये आणि ५० मीटरच्या परिसरात वडापाव, समोसा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या जंक फूडवर त्यांनी पूर्ण बंदी घातली आहे. याच निर्णयाबाबत एका विद्यार्थ्याने त्यांना गाठलं आणि वडापाव सुरू करण्याची गळ घातली.

Tukaram Mundhe Viral Video

मुलाचा प्रश्न ऐकून मुंढेंनी अतिशय नम्रपणे त्याला समजावलं. “वडापाव नाही खाल्ला तर आपलं आयुष्य काही थांबणार नाही. उलट चांगलं खाल्लं तर वाढ चांगली होईल,” असं ते म्हणाले. त्यांनी फॅटी ॲसिड आणि तळलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला. यातून कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत, त्यामुळे प्रथिनांनी (प्रोटीन) युक्त आहार घेण्यावर त्यांनी भर दिला.

वडापाव पाठोपाठ मुलाने चायनीज फूडबद्दलही विचारणा केली. त्यावरही मुंढेंनी अतिशय स्पष्ट शब्दांत चायनीज पदार्थांमधील हानिकारक रंग आणि केमिकल्सचे धोके समजावून सांगितले. चवीपेक्षा आरोग्याला महत्त्व द्या आणि ‘हेल्दी’ राहा, असा मोलाचा सल्ला त्यांनी या चिमुकल्याला दिला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या संवादाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही