प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: ईव्हीएमला विरोध करत निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या काँग्रेसच्या मागणीला आसाममध्ये धक्का बसला आहे. आसाममधील सिलचर महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएमवर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात आली. या निकालावरून, काँग्रेस बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीतही विजय मिळवू शकत नाही, असे मत हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले आहे.
सिलचर महानगरपालिकेच्या एकूण ४२ जागांपैकी तब्बल ३२ जागा जिंकून भाजपने मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून त्यांना अवघ्या २ जागा मिळाल्या, तर उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
एकीकडे बॅलेट पेपरवर काँग्रेसचा पराभव झाला असताना, दुसरीकडे ईव्हीएमच्या माध्यमातून मते चोरली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. देशभरात सुरू असलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेला विरोध करत ती रद्द करण्यात यावी यासाठी विरोधी पक्षांनी मंगळवारी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली.
काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएमला विरोध दर्शवत सातत्याने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. ३० सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी केली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजप नेत्याच्या नातवाकडून मुलीला मारहाण? नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरेंचा पलटवार
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; जंतरमंतरकडे जाणाऱ्या खासदारांच्या बस पोलिसांनी अडवल्या
- मावळमध्ये महायुतीत धुसफूस; आमदार सुनील शेळकेंचा भाजपवर हल्लाबोल
Quick Answers
सिलचर महानगरपालिकेच्या एकूण ४२ जागांपैकी भाजपने ३२ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ २ जागांवर विजय मिळाला.
काँग्रेस बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीतही विजय मिळवू शकत नाही, असे मत हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले आहे.
देशभरात सुरू असलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेला विरोध करत ती रद्द करण्यात यावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विरोधी पक्षांनी आंदोलन केले.
३० सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी केली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









