Share

‘काळ्याकुट्ट भुवया घेऊन.. अगं बाई तू ये’ रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात वाद पेटला असून, दोन्ही नेत्यांनी एकमेकींवर अत्यंत गंभीर वैयक्तिक आरोप केले आहेत.

Published On: 

Chitra Wagh and Rohini Khadse political dispute

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. रोहिणी खडसे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील हा वाद आता अत्यंत वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे.

रोहिणी खडसे यांनी पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. एमपीएससीतील घोटाळे, पेपरफुटी आणि प्रक्रियेतील दिरंगाई यामुळे लाखो तरुणांचे भवितव्य अंधारात ढकलले गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, महाराष्ट्रामध्ये आमदार आणि खासदार ५०-५० कोटी रुपयांना विकले जात असल्याचा दावाही खडसे यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यांनी वाघ यांचा उल्लेख ‘काळ्याकुट्ट भुवया’ असा करत, चित्रा वाघ यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटल्याचा आरोप केला.

खडसे यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिले. राजकीय टीकेच्या पातळ्या ओलांडल्या गेल्यामुळे रोहिणी खडसे यांना आरसा दाखवणे गरजेचे असल्याचे वाघ यांनी म्हटले.

चित्रा वाघ यांनी खडसे यांच्यावर गंभीर पलटवार करताना त्यांच्या पतीचे नाव रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणात आले असल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना संस्कार शिकवू नयेत, असे वाघ म्हणाल्या. तसेच, स्वतःला छेडल्यास आपण कोणालाही सोडत नाही, असा इशाराही त्यांनी खडसे यांना दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही