प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. आता या योजनेच्या आगामी हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा हप्ता दसऱ्यानंतर मिळण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये दिवाळीआधी दिले जाण्याची शक्यताही काहींकडून वर्तवली जात आहे.
या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या शेवटी जमा झाला होता, तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी देण्यात आला होता. त्यामुळे आता महिलांकडून “सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर अखेरीस मिळेल का?” असा प्रश्न विचारला जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील सुमारे १.६६ कोटी पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे.
दरम्यान, ई-केवायसी (e-KYC) आणि आधार-बँक लिंकिंग अपूर्ण असल्याने अनेक महिलांचे हप्ते रोखले गेल्याची माहिती आहे. त्यामुळे योजनेचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण असल्याची आणि बँक खात्याशी आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC आंदोलनातील व्हिडीओवरून वाद; नवनाथ बन लक्षात ठेव, तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
- उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानंतरही रोहित पवारांचा माघार घेण्यास नकार, सरकारला ३ आठवड्यांत आराखडा देण्याचे निर्देश
- पुणे पदवीधरची जागा हातून जाणे हे अपयश; सुनील तटकरेंची स्पष्ट कबुली
Quick Answers
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा हप्ता दिला जातो.
सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा हप्ता दसऱ्यानंतर मिळण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये दिवाळीआधी दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सद्यस्थितीत राज्यातील सुमारे १.६६ कोटी पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे.
ई-केवायसी (e-KYC) आणि आधार-बँक लिंकिंग अपूर्ण असल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते रोखले गेल्याची माहिती आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









